श्रीलंकेच्या गोलंंदाजांना धो-धो धुणारा रोहित शर्मा ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीवर होता फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 03:21 PM2017-12-13T15:21:39+5:302017-12-13T20:51:39+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी लग्न केल्याने पुन्हा एकदा बॉलिवूड-क्रिकेट हे कनेक्शन समोर ...

Rohit Sharma, the Dhan Dhan Dhan Sri Lankan Armed Forces, was a Bollywood actress! | श्रीलंकेच्या गोलंंदाजांना धो-धो धुणारा रोहित शर्मा ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीवर होता फिदा!

श्रीलंकेच्या गोलंंदाजांना धो-धो धुणारा रोहित शर्मा ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीवर होता फिदा!

googlenewsNext
रतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी लग्न केल्याने पुन्हा एकदा बॉलिवूड-क्रिकेट हे कनेक्शन समोर आले आहे. कारण विराटच्या अगोदर बºयाचशा क्रिकेटपटूंचे बॉलिवूड अभिनेत्रींशी संबंध राहिले आहे. त्यामध्ये भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याच्या नावाचाही समावेश आहे. रोहितदेखील एका बॉलिवूड अभिनेत्रीवर जिवापाड प्रेम करीत होता. हे आम्ही नाही तर स्वत: रोहितनेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. 

नोव्हेंबर २०१४ रोजी दिलेल्या एका मुलाखतीत रोहितने चित्रपटांप्रती असलेले प्रेम व्यक्त केले होते. त्याने म्हटले होते की, ‘मधुबाला, वहिदा रहमान, किशोर कुमार, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट बघून मी मोठा झालो आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटांप्रती माझी एक वेगळीच जवळीकता आहे. हिंदीबरोबर हॉलिवूड चित्रपटही मला बघायला आवडतात.’ यावेळी रोहितला बॉलिवूडमधील त्याच्या आवडत्या अभिनेत्रीविषयी विचारले असता, रोहितने दिलेले उत्तर आश्चर्यचकित करणारे होते. 



रोहितने म्हटले होते की, अभिनेत्री करिना कपूर माझी क्रश आहे. करिना मला खूप आवडते. ती खूपच सुंदर आहे. मी तिच्या सौंदर्याचा आजही दिवाना आहे. तिचा कुठलाही चित्रपट असो, मी तो बघतोच, असेही रोहित म्हणाला. दरम्यान, रोहितचे मॉडेल तथा आयटम गर्ल सोफिया हयात हिच्यासोबतदेखील नाव जोडले जाते. असो, १३ डिसेंबरचा दिवस रोहित शर्माकरिता खूपच स्पेशल राहिला आहे. कारण आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस असून, आजच्याच दिवशी त्याने श्रीलंकेविरोधात अतिशय धडाकेबाज अशी डबल सेंच्युरी ठोकली आहे. 

रोहितच्या या डबल सेंच्युरीने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. २०८ धावांची धुवाधार फलंदाजी करताना रोहितचे हे तिसरे द्विशतक ठरले. अशी कामगिरी करणारा रोहित जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर सिक्सर किंग म्हणून त्याची आता नवी ओळख समोर आली आहे. कारण सर्वाधिक सिक्सर मारणारा रोहित दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. 

Web Title: Rohit Sharma, the Dhan Dhan Dhan Sri Lankan Armed Forces, was a Bollywood actress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.