RIP Shashi Kapoor: बी-टाऊनच्या कलाकारांनी अशा शब्दांत जागवल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 20:32 IST2017-12-04T13:56:16+5:302017-12-04T20:32:20+5:30

कपूर घराण्यातला राजबिंडा,देखणा हिरो म्हणजे शशी कपूर.. ज्यांचं हँडसम असणं देखणं दिसणं यावर तरुणी जीव ओवाळून टाकायच्या अशा अभिनेता ...

RIP Shashi Kapoor: B-Town artists remember these words | RIP Shashi Kapoor: बी-टाऊनच्या कलाकारांनी अशा शब्दांत जागवल्या आठवणी

RIP Shashi Kapoor: बी-टाऊनच्या कलाकारांनी अशा शब्दांत जागवल्या आठवणी

ूर घराण्यातला राजबिंडा,देखणा हिरो म्हणजे शशी कपूर.. ज्यांचं हँडसम असणं देखणं दिसणं यावर तरुणी जीव ओवाळून टाकायच्या अशा अभिनेता शशी कपूर यांचे (4 डिसेंबर ) रोजी निधन झाले...१८ मार्च १९३८ साली कोलकतामध्ये शशी कपूर यांचा जन्म झाला.. घरातूनच मिळालेला अभिनयाचा वारसा त्यांनीही जपला..अनेक सिनेमात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या... डान्स करताना खांदे उडवण्याची त्यांची स्टाईल सा-यांनाच भावली.. बिग बी अमिताभ आणि शशी कपूर यांच्या 'दिवार' सिनेमातल्या जुगलबंदीने रसिकांची मनं जिंकली... 'रोटी कपडा और मकान', 'त्रिशूल', 'दो और दो पाच', 'नमक हलाल', 'सिलसिला', 'शान', 'कभी कभी' या हीट फिल्म्स या जोडीने दिल्या आणि प्रेक्षकांच मनोरंजन केलं. 'हाऊसहोल्पडर', 'शेक्सपिअरवाला', 'मुहाफिज' अशा इंग्रजी सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली..एक निर्माता म्हणूनही शशी कपूर यांनी वैविध्यपूर्ण सिनेमांची निर्मिती केली.वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ पृथ्वी थिएटरची स्थापना केली.. अनेक बड्या फिल्मस्टार्ससह वावरताना सिनिअर असल्याचा तोरा शशी कपूर यांनी कधीच मिरवला नाही.कायम माणूसकी आणि साधेपणा जपला.. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याने  जगाचा निरोप घेतला.शशी कपूर यांच्या एक्झिटने चित्रपटसृष्टींवर शोककळा पसरली आहे.  

या कलाकारांनी या शब्दात वाहिली श्रध्दांजली


करण जोहर( दिग्दर्शक- निर्माता)

सगळ्यांना प्रेमात पाडणारं आणि ज्यांच्यासारखं दुसरं कुणीही नाही असा आजवरील अभिनेता आणि जंटलमन सिनेस्टार म्हणजे शशी कपूर. त्यांचं सिनेमा आणि थिएटरसाठी दिलेलं योगदान अतुलनीय. कपूर कुटुंबीयांच्या दुःखात सारेच सहभागी आहोत. ते त्यांच्या कामाच्या रुपात कायम स्मरणात राहतील

रमेश देव( ज्येष्ठ अभिनेते)

शशी हा असा अभिनेता होता, ज्याने कधी अभिनेता होण्याचा मिजास मिरविला नाही. तो नेहमी संपूर्ण युनिटला हसवायचा, खेळवायचा. त्यांचे या वयात खूपच हाल होत होते. त्यांच्याजवळ कोणीच नव्हते. म्हणून एकंदरीत शशीसाठी चांगलेच झाले पण आम्हासाठी अतिशय दुख:द घटना आहे. कपूर घराण्यात शरीराने मोठे होणे ही खूप वाईट गोष्ट आहे, शशीदेखील आता शरीराने खूप मोठा झाला होता. आज आपल्यात ते नसला तरीही आठवणीच्या माध्यमातून सदैव आपल्यात राहतील.


बोमन इरानी (अभिनेता)

सगळ्यात मनमोहक आणि हँडसम शशी कपूर यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दुःख झालंय. त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो. 

अजय देवगण(अभिनेता)
हँडसम जे असतात हँडसमप्रमाणेच जगतात. ते हँडसम होते आणि कायम राहील. सदैव आपल्यात राहतील.तुम्हाला विसरणं कदापि शक्य नाही. तुमच्या मृतात्म्यास शांती लाभो

शेखर सुमन(अभिनेता)


माझ्या जीवनातील सगळ्यात दुःखद दिवस.. शशी कपूर आपल्यातून निघून गेले. माझं सारं करिअर ज्यांच्यामुळे घडलं ती व्यक्ती म्हणजे शशी कपूर. माझ्या व्यवसायिक जीवनातील यशाचे सारे श्रेय त्यांनाच जातं. उत्सव सिनेमात रेखा यांच्यासह काम करण्याची संधी देऊन त्यांनी मला मोठा ब्रेक दिला. जीवनातील प्रत्येक क्षणी तुमची कमी जाणवत राहिल. शशी कपूर हे चित्रपटसृष्टीतील सगळ्यात हँडसम व्यक्ती होते. सगळ्यांचे लाडके, सर्वोत्तम अभिनेता आणि वेगळाच ध्यास असलेला निर्माता अशी त्यांची खासियत होती. त्यांना पाहून पाहून आणि त्यांच्या सारखं बनण्याचा तसंच त्यांच्यासारखं दिसावं असं माझं स्वप्न होतं. ते सोडून गेलेत ही कल्पनाच सहन होत नाही. मी पूर्णपणे कोसळलोय.
 
 


दिनो मौर्या(अभिनेता)

शशी कपूर हे एक रुपेरी पडद्यावरील सगळ्यात हँडसम व्यक्ती होते. मी त्यांचा खूप मोठा फॅन होतो त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो.

श्वेता पंडीत( व्होकालिस्ट)

नव्वदच्या दशकात बालपणी मी कित्येकदा 'प्यार का मौसम' आणि 'प्यार किये जा' हा सिनेमा पाहिला हे सांगू शकत नाही. या सिनेमांतील शशी कपूर हे तर माझे त्यावेळी सगळ्यात मोठे क्रश आणि लाडके कपूर बनले होते.परफेक्ट जंटलमन सुपरस्टार असलेल्या तुमची कायम आठवण येत राहिल. तुमच्या मृतात्म्यास शांती लाभो. 


अर्जुन रामपाल(अभिनेते)
 
तुम्ही आम्हाला इतक्या आठवणी दिल्यात की त्याबद्दल सदैव आभारी राहू. कपूर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत.

Web Title: RIP Shashi Kapoor: B-Town artists remember these words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.