‘RRR ही गे लव्हस्टोरी अन् आलिया फक्त...’, ऑस्कर विजेते रेसुल पुकुट्टी यांची कमेंट वाचून भडकले नेटकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 05:23 PM2022-07-04T17:23:36+5:302022-07-04T17:23:51+5:30
Resul Pookutty takes a dig at RRR : ऑस्कर विजेते साऊंड डिझाईनर, साऊंड एडिटर व साऊंड मिक्सर रेसुल पुकुट्टी यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाबद्दल अशी काही कमेंट केली की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
एस. एस. राजमौलींचा (SS Rajamouli) ‘RRR’ हा सिनेमा यावर्षीचा वर्ल्डवाईड सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा ठरला आहे. सुमारे 1400 कोटी रूपयांची कमाई करत या चित्रपटाचे अनेक विक्रम रचले. हा चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकाने या सिनेमाचं कौतुक केलं. पण याचदरम्यान ऑस्कर विजेते साऊंड डिझाईनर, साऊंड एडिटर व साऊंड मिक्सर रेसुल पुकुट्टी (Resul Pookutty ) यांनी या चित्रपटाबद्दल अशी काही कमेंट केली की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
या कमेंटमध्ये त्यांनी बॉलिवूड सुपरस्टार आलिया भट हिचाही उल्लेख केला. रेसुल पुकुट्टी यांनी ‘आरआरआर’बद्दल केलेली कमेंट नेटकऱ्यांना आवडली नाही. मग काय नेटकऱ्यांनी त्यांना जबरदस्त ट्रोल केलं.
काय म्हणाले पुकुट्टी?
Gay love story ….
— resul pookutty (@resulp) July 3, 2022
अभिनेता व लेखक मुनिष भारद्वाजने ‘आरआरआर’बद्दल सर्वप्रथम एक टिष्ट्वट केलं. ‘काल रात्री 30 मिनिटं आरआरआर नावाचा कचरा बघितला,’ असे ट्वीट मुनिष भारद्वाज यांनी केलं. मुनिष यांच्या या ट्वीटवर ऑस्कर विजेते साऊंड डिझायनर रेसुल पुकुट्टी यांनी लगेच कमेंट केली.
… and @aliaa08 is a prop in that film…
— resul pookutty (@resulp) July 3, 2022
‘आरआरआर ही एक गे लव्हस्टोरी आहे’ असं त्यांनी लिहिलं. इतकंच नाही, त्यांनी पुढे आलियाचाही उल्लेख केला. ‘आलिया भट या सिनेमात केवळ प्रॉप म्हणून दाखवली गेली,’असंही पुढच्या कमेंटमध्ये ते म्हणाले.
नेटकरी संतापले
‘आरआरआर’बद्दलची रेसुल यांची कमेंट वाचून नेटकरी भडकले. अनेकांनी त्यांना ट्रोल करणं सुरू केलं. इतकं की, रेसुल यांनी आपलं कमेंट ऑप्शन बंद केलं. ‘एका ऑस्कर विजेत्या माणसाकडून अशा कमेंटची अपेक्षा नाही,’ असं एका युजरने लिहिलं. ‘दुदैव आहे. तुम्ही ट्रोलर्स सारख्या कमेंट्स करत आहात. तुम्हाला हे शोभणारं नाही,’असं एका युजरने लिहिलं.
रेसुल पुकुट्टी यांनी ब्लॅक, सावरिया,रावन, पुष्पा: द राइज आणि राधे श्याम यांसारख्या सिनेमांसाठी साऊंड डिझाईन केलंय. 2009 मध्ये आलेल्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या सिनेमासाठी त्यांना बेस्ट साऊंड मिक्सिंग या श्रेणीत ऑस्करदेऊन गौरविण्यात आलं होतं.