या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह दोन दिवसांनी मिळाला होता घरात, उतारवयात ओळखणे देखील झाले होते कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 02:48 PM2019-09-26T14:48:05+5:302019-09-26T14:55:35+5:30

ही प्रसिद्ध अभिनेत्री एकटी राहात असल्याने सोसायटीच्या सेक्रेटरीने दोन दिवसांपासून त्यांनी दरवाजा उघडला नसल्याचे पोलिसांना कळवले होते.

Remembering Parveen Babi: The Tragic Life and Death of One popular actress | या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह दोन दिवसांनी मिळाला होता घरात, उतारवयात ओळखणे देखील झाले होते कठीण

या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह दोन दिवसांनी मिळाला होता घरात, उतारवयात ओळखणे देखील झाले होते कठीण

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी ड्युप्लिकेट चावीच्या मदतीने दरवाजा उघडला होता. त्यावेळी त्या मृत अवस्थेत आढळल्या होत्या. त्या घरात एकट्यात राहात असल्याने त्यांचे निधन कधी झाले हे कोणालाच कळले नव्हते.

दिवार, अमर अकबर अन्थॉनी, सुहाग, कालिया, नमक हलाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये परबीन बाबी यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. परबीन बाबी यांनी सत्तर आणि ऐंशीचा काळ गाजवला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

परबीन बाबी या त्या काळातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांचे करियर अतिशय जोमात असताना त्यांना पॅरानॉईड स्क्रिझोफ्रेनिया झाला आणि त्या बॉलिवूडपासून दूर गेल्या. त्यांचे निधन व्हायच्या कित्येक वर्षं आधीपासून त्या एकट्याच राहात होत्या. त्या सार्वजनिक ठिकाणी देखील खूपच कमी हजेरी लावत असत. त्यांचे निधन तर अतिशय वाईट परिस्थितीत झाले. त्यांच्या निधनाविषयी त्यांच्या सोसायटीच्या सेक्रेटरीने पोलिसाना कळवले होते. त्यांनी पोलिसांना फोन करून सांगितले होते की, त्या दोन दिवस कोणालाच दिसल्या नव्हत्या. तसेच त्यांच्या दरवाज्यात दूध आणि वर्तमानपत्रं दोन दिवसांपासून तशीच पडलेली होती. त्यामुळे पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीच्या मदतीने दरवाजा उघडला होता. त्यावेळी त्या मृत अवस्थेत आढळल्या होत्या. त्या घरात एकट्यात राहात असल्याने त्यांचे निधन कधी झाले हे कोणालाच कळले नव्हते. त्या आजूबाजूच्या लोकांशी देखील बोलत नसत. 

परबीन यांचा जन्म 4 एप्रिल 1949 ला गुजरातमधील जुनागडमध्ये झाला. त्या केवळ दहा वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. केवळ 23 वर्षांच्या असताना त्यांना क्रिकेटर सलीम दुराणी यांच्यासोबत काम करण्याची पहिली संधी मिळाली. त्या चित्रपटाचे नाव चरित्र होते, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला असला तरी परबीन यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत तब्बल 15 चित्रपटांमध्ये काम केले आणि सगळेच चित्रपट हिट झाले. त्या काळात त्या त्यांच्या अभिनयाइतक्याच त्यांच्या सौंदर्यासाठी आणि फॅशनसाठी ओळखल्या जात असत. त्या त्या काळातील ग्लॅमरस अभिनेत्री होत्या. एवढेच नव्हे तर त्या काळातही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले होते. परवीन बाबी यांच्यावर चित्रीत झालेले जवानी जानेमन, रात बाकी बात बाकी हे गाणे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. 
 

Web Title: Remembering Parveen Babi: The Tragic Life and Death of One popular actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.