‘मेरी प्यारी बिंदू’चे ‘ये जवानी तेरी’ हे तिसरे गाणे रिलीज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 22:07 IST2017-04-18T16:37:42+5:302017-04-18T22:07:42+5:30

​अभिनेत्री परिणिती चोपडा हिच्या फॅन्सला तिला तब्बल दोन वर्षांनंतर पडद्यावर बघणे खूपच मजेशीर असे ठरणार आहे.

Release of the third song 'Yeh Jawaani Teri' of 'My Sweet Bindu' !! | ‘मेरी प्यारी बिंदू’चे ‘ये जवानी तेरी’ हे तिसरे गाणे रिलीज!!

‘मेरी प्यारी बिंदू’चे ‘ये जवानी तेरी’ हे तिसरे गाणे रिलीज!!

िनेत्री परिणिती चोपडा हिच्या फॅन्सला तिला तब्बल दोन वर्षांनंतर पडद्यावर बघणे खूपच मजेशीर असे ठरणार आहे. ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटात ती अभिनेता आयुष्यमान खुराणा याच्यासोबत बघावयास मिळणार आहे. दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री खूपच चांगली असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. या चित्रपटाचे ‘ये जवानी है तरी’ हे तिसरे गाणे नुकतेच रिलीज झाले असून, गाण्यात परिणिती खूपच सुंदर दिसत आहे. हे गाणे लॉन्च करण्याबरोबरच परिणितीने या गाण्याचे बोलही तिच्या फॅन्ससाठी गुणगुणले आहेत. 

परिणीतीने या चित्रपटाच्या माध्यमातून सिंगिंगमध्येही डेब्यू केला आहे. ‘माना के हम यार नही’ या गाण्याला तिने आवाज दिला आहे. ‘ये जवानी है तेरी’ हे गाणे एक रेट्रो ट्रीट असून, प्रेक्षकांच्या ते प्रचंड पसंतीस उतरत आहे. या गाण्याला नकश अजीज आणि जोनिता गांधी यांनी आवाज दिला आहे. गाण्याबरोबर कोरिओग्राफीही जबरदस्त म्हणावी लागेल. कारण गाण्यातील डान्स तरुणमंडळी लग्न आणि डिस्कोमध्ये कॉपी करतील यात शंका नाही. 



हे गाणे बघितल्यानंतर प्रेक्षकांना शाहरूख खान आणि सुष्मिता सेन यांच्या ‘मैं हू ना’ या चित्रपटातील ‘गोरी गोरी’ हे गाणे नक्कीच आठवेल. सचिन जिगर याने पुन्हा एकदा त्याच्या म्युझिकची ताकद दाखवून दिली आहे. कारण चित्रपटातील आतापर्यंत दोन गाणे प्रेक्षकांना प्रचंड भावत आहेत. शिवाय तिसरे गाणेही मोठ्या प्रमाणात यू-ट्यूबवर सर्च केले जात आहेत. 

हा चित्रपट १७ मे रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात आयुष्यमान लेखकाच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे, तर परिणिती एक अभिनेत्री म्हणून बघावयास मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय रॉय यांनी केले आहे. तसेच परिणितीचा एक्स बॉयफ्रेण्ड मनीष शर्मा या चित्रपटाला प्रोड्यूस करत आहे. 

Web Title: Release of the third song 'Yeh Jawaani Teri' of 'My Sweet Bindu' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.