​या कारणामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सारा अली खान अडकली वादाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 11:49 IST2018-05-25T06:19:19+5:302018-05-25T11:49:19+5:30

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खानची मुख्य भूमिका असलेला केदारनाथ हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या ...

For this reason, before the debut in Bollywood, Sarah Ali Khan was involved in a controversy | ​या कारणामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सारा अली खान अडकली वादाच्या भोवऱ्यात

​या कारणामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सारा अली खान अडकली वादाच्या भोवऱ्यात

शांत सिंग राजपूत आणि सारा अली खानची मुख्य भूमिका असलेला केदारनाथ हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या वादामध्येच अडकलेला आहे. हा चित्रपट खरे तर शाहरुख खानच्या झिरोसोबत डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. मात्र या चित्रपटावरून चित्रपटाची निर्माती प्रेरणा अरोरा आणि सहनिर्माता-दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यामध्ये वाद रंगला असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आणि आता तर या चित्रपटाशी संबंधित अजून एक वाद सुरू झाला आहे.
केदारनाथ हा चित्रपट वादात अडकला असल्याने सारा अली खानने सिम्बा हा चित्रपट नुकताच साईन केला. पण आता साराने चित्रपट साइन केला असल्याने या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक कपूरने साराच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. सारा आणि अभिषेक यांच्यात चित्रीकरणाच्या तारखांवरून वाद झाला असल्याचे म्हटले जात आहे. सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाशी संबंधित करार गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये साइन केला होता. साराने त्यावेळी त्यांना चित्रपटासाठी तारखा देण्याचे कबूल केले होते. केदारनाथ या चित्रपटाच्या पुढील शेड्युलचे चित्रीकरण आता मे महिन्यापासून ५ जुलैपर्यंत होणार आहे. पण सारा जून महिन्यात रणवीर सिंगसोबत सिम्बा या चित्रपटाचे चित्रीकरण करत असल्याने तिला जूनमध्ये चित्रीकरण करणे शक्य नसल्याचे तिच्या एजंटने केदारनाथच्या टीमला कळवले आहे. त्यामुळे अभिषेक यांनी कोर्टाचे दार ठोठावले आहे. केदारनाथ या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्याशिवाय सारा कोणत्याही चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करू शकत नाही असे त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर मांडले आहे. एवढेच नव्हे तर साराने करार तोडल्यामुळे तिने पाच कोटी रुपयांचा दंड भरावा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. 
केदारनाथ या चित्रपटाचे पहिले शेड्यूल उत्तराखंडमध्ये पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर या चित्रपटाचे चित्रीकरण काही काळासाठी थांबवण्यात आले. केदारनाथ हा चित्रपट २०१३ मध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित असून त्यात एक पॅशनेट लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  चित्रपटात सारा एक साध्या आणि गर्ल नेक्स्ट डोअरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न आहे तर सुशांत सिंग राजपूत चित्रपटात पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. 

Also Read : मुलगी सारा अली खानच्या डेब्यू चित्रपटावरून पापा सैफ अली खानने कसली कंबर!

Web Title: For this reason, before the debut in Bollywood, Sarah Ali Khan was involved in a controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.