वाचा...काय वाटते प्रियांका चोप्राला दीपिकाच्या हॉलीवूड डेब्यूबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2017 12:58 PM2017-01-01T12:58:44+5:302017-01-01T12:58:44+5:30

प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोन या दोन बॉलीवूड ए-लिस्ट अभिनेत्रींमध्ये भारतात नंबर १ होण्यासाठी गेली अनेक वर्षे स्पर्धा सुरू ...

Read ... What does Priyanka Chopra think about Deepika's Hollywood debut? | वाचा...काय वाटते प्रियांका चोप्राला दीपिकाच्या हॉलीवूड डेब्यूबद्दल

वाचा...काय वाटते प्रियांका चोप्राला दीपिकाच्या हॉलीवूड डेब्यूबद्दल

googlenewsNext
रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोन या दोन बॉलीवूड ए-लिस्ट अभिनेत्रींमध्ये भारतात नंबर १ होण्यासाठी गेली अनेक वर्षे स्पर्धा सुरू आहे. आता ही चुरस हॉलीवूडमध्ये कोण मोठे नाव करणार अशी झाली आहे. ‘क्वांटिको’च्या माध्यमातून प्रियांकाने जरी आघाडी घेतलेली असली तरी दीपिकासुद्धा ‘ट्रिपल एक्स’च्या माध्यमातून तिला गाठण्यासाठी सज्ज झाली आहे.

विन डिझेलसोबतच्या या चित्रपटासाठी सध्या दीपिकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू आहे. ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सीझनची शूटींग संपवून भारतात आलेल्या प्रियांकाला जेव्हा याबद्दल विचारले तेव्हा तिने आपल्या ‘बाजीराव-मस्तानी’ को-स्टारच्या प्रगतीमुळे खुश असल्याचे सांगितले.

ती म्हणाली की, ‘दीपिका हॉलीवूडमध्ये चांगले काम करत आहे हे पाहून मला आनंदच होतोय. तिच्यामुळे मलादेखील प्रेरणा मिळते. तिच्या चित्रपटाला प्रचंड यश मिळो आणि तिला अपेक्षित असलेले ध्येय ती साध्य करो, अशी मी इच्छा व्यक्त करते.’

जानेवारी महिन्यात १४ तारेखेला ‘ट्रिपल एक्स’ रिलीज होत आहे. यामध्ये दीपिका सुपरस्टंट करताना दिसतेय. प्रियांकासुद्धा मे महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘बेवॉच’ सिनेमातून हॉलीवूड डेब्यू करीत आहे. मात्र या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रियांका काही सेंकदासाठीच दिसत असल्यामुळे तिच्या चाहत्यांची घोर निराशा झाली.

ड्वेन जॉन्सन (द रॉक) आणि हँडसम हंक झॅक एफ्रॉन स्टारर या चित्रपटात प्रियांका खलनायिकेच्या भूमिकेत आहे. दीपिका आणि प्रियांका या दोघी भारतात खूप मोठ्या स्टार असल्यामुळे दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांना येथील व्यवसायाकडून खूप अपेक्षा आहे.

मागच्या वर्षी ‘द जंगल बुक’ने १७० कोटींपेक्षा जास्त कमाई करून अनेक हिंदी चित्रपटांना मागे पछाडले. येत्या काही दिवसांमध्ये दीपिका हॉलीवूडलाही गवसणी घालण्यात यशस्वी ठरते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Web Title: Read ... What does Priyanka Chopra think about Deepika's Hollywood debut?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.