शिल्पा शेट्टीच्या गळ्यातील स्कार्फची किंमत वाचून तुम्हाला भोवळ येईल, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 02:01 PM2017-09-15T14:01:15+5:302017-09-15T19:31:15+5:30

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या बॉलिवूडमधील सर्वांत फिट, स्टायलिश आणि हॉट मॉम्स आहे. शिल्पाचे क्लासी आणि ...

Read the price of Shilpa Shetty's neck scarf and you will get confused, read detailed! | शिल्पा शेट्टीच्या गळ्यातील स्कार्फची किंमत वाचून तुम्हाला भोवळ येईल, वाचा सविस्तर!

शिल्पा शेट्टीच्या गळ्यातील स्कार्फची किंमत वाचून तुम्हाला भोवळ येईल, वाचा सविस्तर!

googlenewsNext
च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या बॉलिवूडमधील सर्वांत फिट, स्टायलिश आणि हॉट मॉम्स आहे. शिल्पाचे क्लासी आणि एलिगेंट स्टाइल नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा शिल्पा याच कारणामुळे चर्चेत आली असून, यावेळची तिची स्टाइल ही साधीसुधी नसून, खूपच हटके आणि भोवळ आणणारी आहे. होय, विमानतळावर पती आणि मुलासोबत स्पॉट झालेल्या शिल्पाच्या गळ्यातील स्कार्फ बघून अनेकांना आता भोवळ येत आहे. कारण या स्कार्पची किंमत ही विचार करण्यापलीकडची आहे. 



पार्टीज आणि रेड कारपेटवर आपल्या सौंदर्याची अदा दाखविणारी शिल्पा नुकतीच पती राज कुंद्रा आणि मुलगा विवान यांच्यासोबत विमानतळावर बघावयास मिळाली. प्रवासानंतरही ती खूपच फ्रेश आणि सुंदर दिसत होती. यावेळी तिने ब्लू रिप्ड डेनिम्स आणि ग्रे टॅँक टॉप घातला होता. यावेळी तिने तिच्या लुकला पेयर करण्यासाठी कॉम्फी स्लिप-आॅन्स, सनग्लासेज आणि घड्याळही घातली होती. मात्र या सर्वांमध्ये आकर्षण ठरले ते तिच्या गळ्यातील स्कार्फ. सुरुवातीला जेव्हा आम्ही शिल्पाला बघितले तेव्हा आम्हाला तिच्या गळ्यातील स्कार्फ सर्वसाधारण वाटला. मात्र जेव्हा त्याच्या किमतीविषयीची माहिती समोर आली तेव्हा अनेकांनाच धक्का बसला. 



कारण शिल्पाच्या गळ्यात असलेल्या स्कार्फच्या किमतीचा अंदाज लावणे मुश्किल आहे. वास्तविक सर्वसाधारणपणे तरुणी तथा महिला ५० ते २०० रुपयांपर्यंतचा स्कार्फ बाळगतात. त्यातही एखाद्या महागड्या शॉपमधून स्कार्फ घेतल्यास त्याची किंमत पाचशे ते एक हजारापर्यंत असते. परंतु शिल्पाच्या गळ्यात असलेला स्कार्फ या किमतीच्या कितीतरी पटीने महागडा होता. होय, Louis Vuitton लिमिटेड एडिशन मोनोग्राम प्रिंट सिल्क-शिफॉन स्कार्फची किंमत ३३० डॉलर २१ हजार रुपये इतकी आहे. 



ही किंमत ऐकून नक्कीच तुम्हाला भोवळ आली असेल. परंतु शिल्पा ऐवढा महागडा स्कार्फ बाळगून आपल्या सौंदर्यात भर पाडते हेही तेवढेच खरे आहे. दरम्यान, शिल्पाच्या या स्कार्फची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार रंगत आहे.  

Web Title: Read the price of Shilpa Shetty's neck scarf and you will get confused, read detailed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.