Raveena Tandon : जे बात! नाव ठेवलं ‘रवीना’, छोट्या वाघिणीला दिलं रवीना टंडनचं नाव, कारण आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 12:10 PM2023-01-06T12:10:56+5:302023-01-06T12:11:06+5:30

Raveena Tandon : रवीना पशुप्रेमी आहे, हे नव्यानं सांगायला नको. तिच्या सोशल मीडिया अकाऊंट याची झलक पाहायला मिळते. सवड मिळाली तशी रवीना जंगल सफारीवर निघते. पण हे पशुप्रेम केवळ जंगल सफारीपुरतंच मर्यादीत नाही...

Raveena Tandon Gets Cub Named After Her In Kanpur Zoo Actress Sends Heaters To Tiger Baby To Beat Winters | Raveena Tandon : जे बात! नाव ठेवलं ‘रवीना’, छोट्या वाघिणीला दिलं रवीना टंडनचं नाव, कारण आहे खास

Raveena Tandon : जे बात! नाव ठेवलं ‘रवीना’, छोट्या वाघिणीला दिलं रवीना टंडनचं नाव, कारण आहे खास

googlenewsNext

होय, कानपूर अभयारण्यानं आपल्या येथील एका छोट्या वाघिणीला बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचं (Raveena Tandon) नाव दिलंय. कारणही खास आहे. मुक्या वन्य जीवांबद्दलचं रवीनाचं प्रेम याला कारण आहे. रवीना पशुप्रेमी आहे, हे नव्यानं सांगायला नको. तिच्या सोशल मीडिया अकाऊंट याची झलक पाहायला मिळते. सवड मिळाली तशी रवीना जंगल सफारीवर निघते. पण हे पशुप्रेम केवळ जंगल सफारीपुरतंच मर्यादीत नाही. आता रवीनाने कानवूर अभयारण्यातील प्राण्यांना मदतीचा हात दिला आहे. या कडाक्याच्या थंडीत मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी ती पुढे सरसावली आहे. रवीनाने कानपूर अभयारण्यातील प्राण्यांसाठी थंडीपासून बचावासाठी मदत पाठवली आहे. काही हिटर्स व काही प्राण्यांसाठी आवश्यक औषधं तिने पाठवली आहेत.

रवीनाला वन्य प्राण्यांबद्दल असलेला हा जिव्हाळा बघता कानपूर अभयारण्यानेही या प्रेमाची उतराई म्हणून आपल्या येथील एका छोट्या वाघिणीला रवीना हे नाव दिलं आहे.


रवीनाने पाठवलेल्या मदतीची खेप अभयारण्यात पोहोचली. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत कानपूर अभयारण्याचे कर्मचारी रवीना टंडनचे आभार व्यक्त करताना दिसत आहेत. रवीनाच्या या कामाचं चाहत्यांनीही कौतुक केलं आहे. तू खरोखर रिअल हिरोईन आहेस, अशा शब्दांत चाहते तिचं कौतुक करत आहेत. कोरोना महामारीकाळातही रवीनाने मुक्या जीवांसाठी अशाप्रकारे मदत केली होती.

मध्यंतरी आली होती अडचणीत...
मध्यंतरी जंगल सफारीमुळे रवीना अडचणीत आली होती.सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील जंगल  सफारीचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र याच सफारीच्या व्हिडीओमुळे ती अडचणीत सापडली होती. सफारीदरम्यान रवीना वाघाच्या जवळ जात होती.   सोशल मीडियावरील या व्हिडीओत रवीनाची जीप वाघाच्या जवळ जात असल्याचं पहायला मिळालं होतं. कॅमेºयाच्या शटरचा आवाज येताच त्याच क्षणी वाघाच्या डरकाळीचाही आवाज व्हिडीओत ऐकायला मिळाला होता. अर्थात रवीनाने असं काहीही झालं नसल्याचा खुलासा केला होता. त्या सर्व स्टोरीज या चुकीच्या होत्या, एक स्टोरी आली आणि मग त्यानंतर एकामागे एक सगळ्या छापण्यात आल्या. त्याचं काही होणार नाही. त्यापेक्षा आता मध्य प्रदेश सरकारकडून मला वन्यजीवांचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्याचा प्रस्ताव आला असून त्यांनी याप्रकरणी माझी माफीही मागितली आहे. त्यामुळे कुठलाही वाद निर्माण झाला नाही', असं रवीना म्हणाली होती.

Web Title: Raveena Tandon Gets Cub Named After Her In Kanpur Zoo Actress Sends Heaters To Tiger Baby To Beat Winters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.