Animal नंतर रश्मिका मंदानाच्या मानधनात वाढ?, या चर्चेवर अभिनेत्रीनं सोडलं मौन, म्हणते - यावर प्रत्यक्षात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 03:55 PM2024-02-06T15:55:10+5:302024-02-06T15:56:04+5:30

Rashmika Mandanna On Her Fees:अभिनेत्री रश्मिका मंदानाचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट तिच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटानंतर अभिनेत्रीने तिच्या मानधनात वाढ केल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दरम्यान आता या चर्चेवर रश्मिकाने मौन सोडले आहे.

Rashmika Mandanna's salary increase after Animal Movie?, the actress left silence on this discussion, says - Actually... | Animal नंतर रश्मिका मंदानाच्या मानधनात वाढ?, या चर्चेवर अभिनेत्रीनं सोडलं मौन, म्हणते - यावर प्रत्यक्षात...

Animal नंतर रश्मिका मंदानाच्या मानधनात वाढ?, या चर्चेवर अभिनेत्रीनं सोडलं मौन, म्हणते - यावर प्रत्यक्षात...

मागील वर्षी रिलीज झालेल्या 'अ‍ॅनिमल' (Animal Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सर्वांना चकीत केले आहे. यात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), बॉबी देओल (Bobby Deol) आणि तृप्ती डिमरी (Tripti Dimri) सारखे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटाने जगभरात दमदार कमाईसोबत प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटविली आहे. या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने तिच्या मानधनात वाढ केल्याची चर्चा होते आहे. दरम्यान, आता या चर्चेवर रश्मिका मंदानाने मौन सोडले आहे आणि चाहत्यांनाही सवालही केला आहे.

नुकतेच असे वृत्त समोर आले होते की, रश्मिका मंदानाने अ‍ॅनिमलनंतर आपल्या मानधनात वाढ केली आहे आणि आगामी काळात ती कोणत्याही सिनेमात काम करण्यासाठी चांगलेच मानधन घेताना दिसू शकते. यासोबतच असे सांगितले की, सध्या ती एका सिनेमासाठी जवळपास ४ कोटी मानधन घेते. एका मीडिया पोर्टलवरील पोस्ट पाहून रश्मिका मंदानाने प्रतिक्रिया दिली आहे. 

रश्मिका मंदानेन एक्स (ट्विटर) अकाउंटवर यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, अशा चर्चेवर मी स्वतः हैराण आहे. हे सर्व पाहिल्यानंतर मला वाटते की यावर मी प्रत्यक्षात विचार केला पाहिजे. जर निर्माते याबद्दल प्रश्न विचारतील तेव्हा मी म्हणेन सर, मीडिया हे सर्व बोलत आहेत आणि मला वाटतं त्यांच्या म्हणणं खरं करायला पाहिजे. तुम्हीच मला सांगा की मी काय केले पाहिजे. मानधन वाढवल्याच्या चर्चेला अभिनेत्रीने पूर्णविराम लावला आहे.

वर्कफ्रंट..
रश्मिका मंदानाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अ‍ॅनिमलच्या बंपर सक्सेसनंतर रश्मिका मंदाना बऱ्याच सिनेमात दिसणार आहे. यापैकी ती धनुषच्या डीएनस आणि अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ चित्रपटात झळकणार आहे. 

Web Title: Rashmika Mandanna's salary increase after Animal Movie?, the actress left silence on this discussion, says - Actually...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.