Guess Who: फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज आहे सुपरस्टार,ओळखा पाहू कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 07:18 PM2023-07-18T19:18:28+5:302023-07-18T19:23:59+5:30

फोटोत दिसणारी ही क्युट चिमुकली या आज हिंदी आणि साउथ चित्रपटांची मोठी स्टार बनली आहे.

Rashmika mandanna is too cute in this throwback photo | Guess Who: फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज आहे सुपरस्टार,ओळखा पाहू कोण आहे ती?

Guess Who: फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज आहे सुपरस्टार,ओळखा पाहू कोण आहे ती?

googlenewsNext

बऱ्याचदा कलाकार त्यांच्या बालपणींचे फोटो आणि त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होतात. दरम्यान असाच साऊथ  इंडस्ट्रीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीचाही बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतील चिमुरडीला तुम्ही ओळखलंत का?,  चेहऱ्यावर हात ठेवून पोज देणारी ही मुलगी आजच्या तारखेतील दक्षिणेतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.आम्ही तुम्हाला सांगतो की कोण आहे ही अभिनेत्री.

या अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिला ओळखले असेलच. इतक्या हिंटनंतरही तुम्ही तिला ओळखले नसले तर  आम्ही तुम्हाला सांगतो. ही मुलगी दुसरी कोणी नसून नॅशनल क्रश आणि पुष्पा स्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)आहे.  या फोटोंमध्‍ये अभिनेत्रीचा क्यूटनेस सर्वांची मने जिंकतो. हे फोटो पाहून असे दिसते की अभिनेत्री तिच्या बालपणातही खूप क्यूट होती. त्याचा क्यूटनेस आजही चाहत्यांची मने जिंकतो.

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही मूळची कन्नड अभिनेत्री आहे. जिने किरिक पार्टी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. यानंतर अभिनेत्रीने तामिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. जिथे अभिनेत्रीने गीता गोविंदम, डियर कॉम्रेड सारखे मोठे हिट चित्रपट दिले. यानंतर, अभिनेत्रीने अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा चित्रपटाद्वारे पॅन इंडियामध्ये पदार्पण केले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता लवकरच ही अभिनेत्री या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात पुष्पा २ मध्ये दिसणार आहे. तसेच ती संदीप रेड्डी वांगाच्या 'अ‍ॅनिमल' सिनेमात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओलहीसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Rashmika mandanna is too cute in this throwback photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.