रणवीरने सांगितली पद्मावतीची ‘रिलीज डेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 18:07 IST2016-11-12T17:54:45+5:302016-11-12T18:07:12+5:30

याची माहिती देण्यासाठी रोमन अंकांचा वापर केला आहे

Ranveer releases Padmavati's 'Release Date' | रणवीरने सांगितली पद्मावतीची ‘रिलीज डेट’

रणवीरने सांगितली पद्मावतीची ‘रिलीज डेट’

ong>संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पद्मावती’ची रिलीज डेट रनवीर सिंगने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोच्या माध्यमातून जाहीर केली आहे. रनवीरने शेअर केलेल्या फोटोमध्ये याची माहिती देण्यासाठी रोमन अंकांचा वापर केला आहे. हे रोमन अंक म्हणजे पद्मावतीची रिलीज डेट मानली जात आहे.

रणवीरने ‘इन्स्टाग्राम’ या सोशल नेटवर्किंगवर एक फोटो शेअर केला आहे. यात केवळ त्याचे डोळे दिसत आहेत. त्याच्या या फ ोटोकडे पाहून त्यांची गंभीर मुद्रा असल्याचे दिसते. या फोटोवर त्याने VII. XI. XVII असे रोमन अंकात लिहले आहे. या रोमन अंकाचा अर्थ 17.11.2017 असा होतो. विशेष म्हणजे 17 नोव्हेंबर 2017 हा दिवस शुक्रवार आहे. यामुळे त्याने ही तारीख ‘पद्मावती’च्या रिलीजची असावी असा अंदाज बांधला जात आहे. यापूर्वी रणवीरने भन्साळी यांच्या ‘गलियोंकी रासलीला रामलीला’ व बाजीराव मस्तानी या चित्रपटात काम केले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटात दीपिका त्याच्या अपोझिट होती. 

">http://


सध्या रणवीर सिंग ‘पद्मावती’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोन व शाहीद कपूर यांच्या प्रमुख भूमिका असून रनवीर सिंग अलाऊद्दीन खिलजीची भूमिका क रणार आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांचा ड्रिम प्रोजेक्ट मानला जात आहे.  हा बिगबजेट चित्रपट असेल असेही सांगण्यात येत आहे. 

रनवीर सिंग सध्या ‘पद्मावती’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असला तरी आदित्य चोप्राच्या आगामी ‘बेफि क्रे’ या चित्रपटाचे प्रमोशनही करतो आहे. पुढील महिन्यात 9 डिसेंबरला बेफिक्रे  रिलीज होणार आहे. त्यामुळे बेफिक्रेचे प्रमोशनल इव्हेंट सुरू होण्यापूर्वी ‘पद्मावती’च्या शूटिंगचा बराचसा भाग पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘बेफिक्रे’मध्ये रनवीर सिंग वाणी कपूरसोबत रोमांस करताना दिसणार आहे. 

Web Title: Ranveer releases Padmavati's 'Release Date'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.