​राणी मुखर्जी सांगतेय या व्यक्तीमुळे ती आली अभिनयक्षेत्रात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 13:17 IST2018-02-22T07:47:31+5:302018-02-22T13:17:31+5:30

राणी मुखर्जीने राजा की आयेगी बारात या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने तिच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट ...

Rani Mukherjee tells me that this person has acted in the acting field | ​राणी मुखर्जी सांगतेय या व्यक्तीमुळे ती आली अभिनयक्षेत्रात

​राणी मुखर्जी सांगतेय या व्यक्तीमुळे ती आली अभिनयक्षेत्रात

णी मुखर्जीने राजा की आयेगी बारात या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने तिच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाचा कुछ कुछ होता है या चित्रपटात तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. तिने अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा अशा वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटात आजवर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. 
राणी मुखर्जीने खूपच कमी वयात अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ती अभिनयक्षेत्रात येण्यासाठी केवळ एक व्यक्ती जबाबदार असल्याचे राणीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. राणी सांगते, मी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले त्यावेळी मी खूपच लहान होते. माझ्या आईने मला सांगितले की, तू अभिनेत्री बन, या क्षेत्रात तू चांगले करियर करू शकशील... आणि त्यामुळेच मी अभिनेत्री बनली. माझ्या आईने माझे करियर निवडले होते. ते करियर माझ्यासाठी योग्य असेल असा मी विचार करूनच चित्रपटांमध्ये काम करायचे ठरवले. आज मी जे यश मिळवले आहे, त्याचा जेव्हा मी विचार करते. तेव्हा माझ्या लक्षात येते की, माझे स्वप्न भविष्यात काय असणार हे माझ्या आईला आधीच कळले होते. मी अभिनयाशिवाय आज माझ्या करियरचा विचारच करू शकत नाही असे मला वाटते. 
राणी चार वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. तिचा हिचकी ह चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये ती एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी मल्होत्राने केले असून मनीष शर्माने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. राणी सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच व्यग्र आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण तिने केवळ ३८ दिवसांत पूर्ण केले आहे. राणीचे लग्न प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्यासोबत झाले असून त्यांना आदिरा ही मुलगी आहे. आदिराला अधिकाधिक वेळ देता यावा यासाठीच राणी अनेक वर्षं अभिनयक्षेत्रापासून दूर होती. 

Also Read : ‘डान्स इंडिया डान्स’च्या सेटवर राणी मुखर्जीने व्यक्त केली ही इच्छा,जाणून तुम्हीही व्हाल हैराण!

Web Title: Rani Mukherjee tells me that this person has acted in the acting field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.