राणी मुखर्जीने लेक आदिराला घेऊन केला खुलासा, म्हणाली- तिला हे जाणवून देणं...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 02:51 PM2023-04-01T14:51:11+5:302023-04-01T14:57:34+5:30

सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, राणी मुखर्जी आपल्या मुलीला लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतात. विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षांत आदिराचा एकही फोटो सार्वजनिकपणे काढण्यात आलेला नाही.

Rani mukerji talk with kareena kapoor actress reveal about her daughter adira | राणी मुखर्जीने लेक आदिराला घेऊन केला खुलासा, म्हणाली- तिला हे जाणवून देणं...

राणी मुखर्जीने लेक आदिराला घेऊन केला खुलासा, म्हणाली- तिला हे जाणवून देणं...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीचा हा चित्रपट  लोकांनाही खूप आवडला आहे. बॉलिवूड स्टार्सपासून ते प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. राणी ही आपलं वैयक्तिक  आणि व्यावसायिक आयुष्य वेगळे ठेवते. त्याने अलिकडेच आपली मुलगी आदिराबद्दल एका मुलाखतीत सांगितले आहे की, तिने अद्याप तिचे कोणतेही फोटो सार्वजनिक करू दिलेले नाही.

अभिनेत्री राणी मुखर्जीने चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत लग्न केले होते. या कपलला आदिरा नावाची मुलगी असून ती आता आठ वर्षांची आहे. मात्र, गेल्या आठ वर्षांत अभिनेत्रीच्या मुलीचा एकही फोटो सार्वजनिकपणे काढण्यात आलेला नाही. पापाराझी अनेकदा स्टार्सच्या मुलांचे फोटो क्लिक करायला धावतात. अभिनेत्रीने करीना कपूरच्या व्हॉट वुमन वॉन्ट या शोमध्ये आदिराचा फोटो घेतल्याबद्दल राणी मुखर्जी स्पष्टपणे बोलली.  

 करीना कपूरशी बोलताना, राणी म्हणाली, मी माझ्या मुलीला इतक्या वर्षांत मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून दूर ठेवण्यात यशस्वी झाले. यावर करीना म्हणाली की हे करण्यासाठी नक्कीच सुपर पॉवरची गरज आहे, तेव्हा राणी म्हणाली की नाही, सुपर पॉवर नाही. मी त्यांना (पापाराझी) खूप प्रेमाने सांगितले की कृपया मुलीचे फोटो काढू नका आणि त्यांनीही होकार दिला. तेही खूप प्रेमाने आणि पहिल्यापासून असेच आहे. अभिनेत्री पुढे म्हणाली की त्यांना माहित आहे की आदित्य आणि मी वैयक्तिक आयुष्य लाईमलाईटपासून दूर ठेवतो.  

राणी म्हणाली की, माझ्यासाठी आदिराच्या शाळेत एक सामान्य संगोपन करणे आवश्यक आहे, कारण जेव्हा तुम्ही प्रसिद्ध आईचे मुलं असता तेव्हा त्याच्याकडे सामान्य मुलापेक्षा जास्त लक्ष केंद्रित केले जाते. आदिराला हे जाणवून देणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं की ती पण सामान्य मुलगी आहे. 
 

Web Title: Rani mukerji talk with kareena kapoor actress reveal about her daughter adira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.