रणबीर कपूरबद्दल पहिल्यांदा बोलली आलिया भट्ट, जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 16:41 IST2018-04-29T11:11:44+5:302018-04-29T16:41:44+5:30
गेल्या काहीकाळापासून अभिनेता रणबीर कपूर आणि चुलबुली गर्ल आलिया भट्ट यांच्यातील लिंकअपच्या बातम्या सातत्याने समोर येत आहे. रणबीर आणि ...

रणबीर कपूरबद्दल पहिल्यांदा बोलली आलिया भट्ट, जाणून घ्या!
ग ल्या काहीकाळापासून अभिनेता रणबीर कपूर आणि चुलबुली गर्ल आलिया भट्ट यांच्यातील लिंकअपच्या बातम्या सातत्याने समोर येत आहे. रणबीर आणि आलिया पहिल्यांदा ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून एकत्र येणार आहेत. मात्र या चित्रपटाच्या शूटिंग अगोदरच दोघांमध्ये जवळिकता वाढू लागल्याने, त्यांच्यातील लिंकअपच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलचे शूटिंग पूर्ण झाले आहे.
नुकतेच या दोघांना जोया अख्तरच्या पार्टीत एकत्र बघण्यात आले होते. तुमच्या माहितीसाठी आलिया जोया अख्तरच्या आगामी ‘गली बॉय’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग तिच्या अपोझिट आहे. या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यानिमित्त जोयाने तिच्या घरी एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत आलिया आणि रणबीर एकत्र आले होते. शिवाय पार्टी संपल्यानंतर दोघेही एकत्रच जोयाच्या घराबाहेर पडले.
![]()
दरम्यान, आलिया आणि रणबीरने अद्यापपर्यंत त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला नाही. मात्र आता आलियाने बोलता बोलता आपल्या मनातील गूढ उकल केले. नुकतेच आलियाने ‘बह्मास्त्र’मध्ये रणबीरसोबत काम करण्यावरून मुंबई मिररशी बोलताना सांगितले की, ‘ब्रह्मास्त्रचे शेड्युल खूपच लांबलचक होते. मात्र जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत काम करीत असता तेव्हा तुम्हाला अधिकच्या कामाचा अजिबातच अंदाज येत नाही. हिंदी सिनेमात पहिल्यांदा ब्रह्मास्त्रसारख्या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. हा आमच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. मी हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे की, लोकांच्या चित्रपटाबद्दल काय रिअॅक्शन येतील.’
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन अयना मुखर्जी करीत आहेत. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्याचबरोबर टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. वृत्तानुसार, मौनी या चित्रपटात नकारात्मक भूमिकात साकारत आहे.