रणबीर-अनुष्काची जोडी नं.१

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 18:22 IST2016-12-04T18:22:41+5:302016-12-04T18:22:41+5:30

एका साईटने केलेल्या महिन्याच्या अहवालानुसार, रणबीर-अनुष्काच्या जोडीला ‘नंबर १’ च्या स्थानावर नेऊन ठेवले आहे. बॉक्स आॅफिसवरील परफॉर्मन्स, माध्यमांमध्ये त्यांच्या प्रकाशित होणाऱ्या बातम्या, टीव्ही, आॅनलाईन, ब्रँड जाहिराती, चाहत्यांमध्ये प्रसिद्धी या आधारावरून या कलाकारांची निवड करण्यात येते.

Ranbir-Anushka Jodi No. 1 | रणबीर-अनुष्काची जोडी नं.१

रणबीर-अनुष्काची जोडी नं.१

दिल हैं मुश्किल’ चित्रपटातून रणबीर-अनुष्का यांच्या जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. दोघांमधील ‘दोस्ती’ हा प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरला. एका साईटने केलेल्या महिन्याच्या अहवालानुसार, रणबीर-अनुष्काच्या जोडीला ‘नंबर १’ च्या स्थानावर नेऊन ठेवले आहे. बॉक्स आॅफिसवरील परफॉर्मन्स, माध्यमांमध्ये त्यांच्या प्रकाशित होणाऱ्या  बातम्या, टीव्ही, आॅनलाईन, ब्रँड जाहिराती, चाहत्यांमध्ये प्रसिद्धी या आधारावरून या कलाकारांची निवड करण्यात येते. 

                         

                        

‘ये जवानी हैं दिवानी’, ‘रॉकस्टार’ यासारख्या चित्रपटातून अभिनयाचे उत्तम सादरीकरण करणारा अभिनेता ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मुळे एकदमच प्रकाशझोतात आला. ‘तमाशा’ नंतर त्याला बॉक्स आॅफिसवर त्याचा चित्रपट हिट होणं अपेक्षित होतं. त्याला ‘ऐ दिल...’ मिळाला आणि त्याचं नशीबंच पालटलं. अनुष्का शर्मानेही ‘फिल्लोरी’च्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. ‘सुल्तान’ मुळे ती यशाच्या शिखरावर तर होतीच पण ‘ऐ दिल..’ मुळे तिचा आणखी एक चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट झाला.  

                           

 

Web Title: Ranbir-Anushka Jodi No. 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.