जे बात!! सुपरस्टार राम चरणची बातच न्यारी, रिलीजआधीच ‘RC15’ सिनेमानं कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 08:00 AM2022-02-18T08:00:00+5:302022-02-18T08:00:07+5:30

Ram Charan upcoming movie RC15: दिग्दर्शक शंकर यांच्या ‘आरसी 15’ ( RC15) या सिनेमात राम चरण झळकणार आहे. त्याच्या याच चित्रपटाबद्दल एक मोठ्ठी बातमी आहे.

Ram Charan upcoming movie zee studios paid 35cr | जे बात!! सुपरस्टार राम चरणची बातच न्यारी, रिलीजआधीच ‘RC15’ सिनेमानं कमावले इतके कोटी

जे बात!! सुपरस्टार राम चरणची बातच न्यारी, रिलीजआधीच ‘RC15’ सिनेमानं कमावले इतके कोटी

googlenewsNext

Ram Charan upcoming movie RC15: साऊथ सुपरस्टार राम चरणचा (Ram Charan) ‘आरआरआर’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे आणि हा सिनेमा रिलीज होताच राम चरणचा आणखी एक मोठा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  दिग्दर्शक शंकर यांच्या ‘आरसी 15’ ( RC15) या सिनेमात राम चरण झळकणार आहे. त्याच्या याच चित्रपटाबद्दल एक मोठ्ठी बातमी आहे. होय, चर्चा खरी मानाल तर प्रदर्शनाआधीच या सिनेमाने 350 कोटींची कमाई केली आहे.

सूत्रांच्या हवाल्याने बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, झी स्टुडिओने या चित्रपटाच्या मेकर्ससोबत 350 कोटींची डील केली आहे. या डीलअंतर्गत झी स्टुडिओने चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे सॅटेलाईट, डिजिटल राईट्स खरेदी केले आहे. अन्य भाषेतील व्हर्जनचे राईट्स लोकल स्टुडिओंना विकले जाणार असल्याचे कळतेय.

आरसी15 हा सिनेमा एक पॉलटिकल ड्रामा असणार आहे. एकाचवेळी तो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होतोय. रामचरणने या चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण केलं आहे. लवकरच तो दुसरं शेड्यूल पूर्ण करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर रिलीज करण्याचा मेकर्सचा इरादा आहे. 

‘आरसी 15’ चा बजेट सुमारे 200 कोटींचा असल्याची माहिती अहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटातील एक ट्रेन फाइट सीन आहे. या 7 मिनिटांच्या सीनवर तब्बल 70 कोटी रूपये खर्च करण्यात आला. रामचरण सोबतच त्याचे जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘विनय विद्या राम’ या चित्रपटानंतर कियाराचा रामचरणसोबतचा हा दुसरा सिनेमा आहे. या दोघांशिवाय अभिनेत्री अंजली, जयराम, सुनील, नवीन चंद्रा यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तूर्तास या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.

Web Title: Ram Charan upcoming movie zee studios paid 35cr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.