राखी सावंतला अटक केलीच नाही; पंजाब पोलिसांचा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2017 22:57 IST2017-04-04T17:26:19+5:302017-04-04T22:57:46+5:30

मंगळवारचा दिवस बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत हिच्याबाबतीत लागोपाठ घडणाºया घटनांनी गाजला. सुरुवातीला अटक अन् नंतर पोलिसांकडूनच नकार अशा ...

Rakhi Sawant not arrested; Punjab police disclose! | राखी सावंतला अटक केलीच नाही; पंजाब पोलिसांचा खुलासा!

राखी सावंतला अटक केलीच नाही; पंजाब पोलिसांचा खुलासा!

गळवारचा दिवस बॉलिवूडची आयटम गर्ल राखी सावंत हिच्याबाबतीत लागोपाठ घडणाºया घटनांनी गाजला. सुरुवातीला अटक अन् नंतर पोलिसांकडूनच नकार अशा दोन घटना लागोपाठ समोर आल्याने राखीबाबतीत नेमके काय घडले असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला नसेल तरच नवल.

मंगळवारी दुपारच्या दरम्यान पंजाब, लुधियाना पोलिसांनी राखीला ताब्यात घेतल्याची बातमी क्षणार्धातच सर्वदूर पसरली; मात्र त्यानंतर पोलिसांनी तिच्या अटकेच्या बातमीस नकार दिला. लुधियानाचे पोलीस उपायुक्त ध्रुमन निम्बाळे यांनी सांगितले की, लुधियानाचे चार सदस्यीय पथक राखीला अटक करण्यासाठी मुंबईला पोहोचले होते; मात्र तिने दिलेल्या पत्त्यावर राखी राहत नसल्याची बाब समोर आल्याने त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले आहे. सध्या हे पथक ट्रेनमध्ये असून, बुधवारपर्यंत लुधियाना येथे पोहोचणार आहे. तसेच राखीवर पुढील कारवाईसाठी न्यायालयाचे निर्देश मागविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

राखीवर महर्षी वाल्मीक व त्यांच्या अनुयायांप्रती अनुद्गार काढत धार्मिक भावना दुखविल्याचा आरोप आहे. गेल्यावर्षी राखीने म्हटले होते की, ‘मी लहानपणी वाचले होते की, वाल्मीकी दरोडेखोर होते; पुढे ते संत बनले. मीकाजी असेच काहीसे आहेत’ राखीच्या या वक्तव्यानंतर संबंध वाल्मीकी समाजाने तिचा निषेध केला होता. ठिकठिकाणी निषेध नोंदवित राखीला अटक केली जावी अशी मागणी केली होती. 

पुढे अ‍ॅड. नारिंदर आदिया यांनी राखीविरोधात याचिका दाखल केली होती. त्यानुसार गेल्या ९ मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान लुधियानाच्या एका स्थानिक न्यायालयाने तिच्याविरोधात अटक वॉरंट बजावले होते. यावर राखीने खुलासा करताना म्हटले होते की, मी निर्दोष आहे. मी सोशल वर्क करण्यावर विश्वास ठेवते. मी काही सलमान खान नाही, मी राखी सावंत आहे. माझ्यावर अशाप्रकारचे आरोप लावून कोणाला काहीच मिळणार नाही. कारण मी एक सामान्य मुलगी आहे. 

दरम्यान, पोलिसांनी न्यायालयाचे आदेशाचे पालन करताना राखीला अटक करण्यासाठी एक पथक मुंबईला पाठविले होते; मात्र राखीने पत्ताच चुकीचा दिलेला असल्याने हे पथक रिकाम्या हातानेच परतले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० मार्च रोजी असून, राखी आता न्यायालयात हजर होणार काय? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहे. दरम्यान राखीने वाल्मीकी समुदायाची यापूर्वीच माफी मागितली आहे. 

राखीच्या प्रवक्त्याचा वेगळाच सूर
राखी सावंत हिचा प्रवक्ता पारूल चावला यांनी आयएएनएसशी बोलताना म्हटले की, राखीला अटक करण्यात आली नसून, तिने आत्मसमर्पण केले आहे. माझी राखीबरोबर व्हॉट्स अ‍ॅपवर चर्चा झाली असून, तिने आत्मसमर्पण केले असा दावा चावला यांनी केला आहे. 

Web Title: Rakhi Sawant not arrested; Punjab police disclose!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.