-तर ‘रब ने बना दी जोडी’मध्ये नसती अनुष्का!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 15:10 IST2016-10-15T15:10:42+5:302016-10-15T15:10:42+5:30

करण जोहरने अनेक वर्षांनंतर एका रहस्यावरून पडदा उठवला आहे. हे रहस्य आहे, अनुष्का शर्माबद्दलचे. होय, अनुष्का  व शाहरूखचा ‘रब ...

'Rab did not make the couple' Anushka !! | -तर ‘रब ने बना दी जोडी’मध्ये नसती अनुष्का!!

-तर ‘रब ने बना दी जोडी’मध्ये नसती अनुष्का!!

ण जोहरने अनेक वर्षांनंतर एका रहस्यावरून पडदा उठवला आहे. हे रहस्य आहे, अनुष्का शर्माबद्दलचे. होय, अनुष्का  व शाहरूखचा ‘रब ने बना दी जोडी’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलचं. या चित्रपटात शाहरूख सारखा दिग्गज कलाकार असूनही यातील अनुष्काच्या कामाचे बरेच कौतुक झाले होते. आदित्य चोप्रा दिग्दर्शित याच चित्रपटाद्वारे अनुष्काने बॉलिवूड डेब्यू केले होते. करण हा आदित्य आणि शाहरूख दोघांचाही बेस्ट फ्रेन्ड. याच बेस्ट फे्रन्डची गोष्ट त्यावेळी आदित्य व शाहरुखने ऐकली असती तर ‘रब ने बना दी जोडी’मध्ये कदाचित अनुष्का नसती. होय, खुद्द करणनेच हे ‘रहस्य’ उघड केले. मला अनुष्का ‘रब ने बना दी जोडी’साठी परफेक्ट वाटली नव्हती. मला आदित्यने अनुष्काचे काही फोटो दाखवले होते. मला त्यावेळी ते फारसे आवडले नव्हते. पण तोपर्यंत आदित्यने अनुष्काला फायनल केले होते. अनुष्का फार काळ बॉलिवूडमध्ये टिकू शकणार नाही, असा माझा अंदाज होता, असे करणने सांगितले. विशेष म्हणजे यावेळी अनुष्काही करणसोबत होती. मग काय, दोघेही करण अन् अनुष्का एकमेकांकडे बघत खो-खो हसत सुटले. एकंदर काय तर अनुष्काने करणचा अंदाज चांगलाच खोटा ठरवला!!

Web Title: 'Rab did not make the couple' Anushka !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.