PS1 Box Office Day 2: 'पोन्नियिन सेल्वन १'ची छप्परफाड कमाई, देशभरात केली इतक्या कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 03:08 PM2022-10-02T15:08:55+5:302022-10-02T15:09:20+5:30

PS1 Box Office Day 2: 'पोन्नियिन सेल्वन-भाग १' चित्रपट ३० सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच हिट झाला आणि पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली.

PS1 Box Office Day 2: 'Ponniyin Selvan 1' is a smash hit, grossing so many crores across the country | PS1 Box Office Day 2: 'पोन्नियिन सेल्वन १'ची छप्परफाड कमाई, देशभरात केली इतक्या कोटींची कमाई

PS1 Box Office Day 2: 'पोन्नियिन सेल्वन १'ची छप्परफाड कमाई, देशभरात केली इतक्या कोटींची कमाई

googlenewsNext

'पोन्नियिन सेल्वन-भाग १' चित्रपट ३० सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच हिट झाला आणि पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली. ऐश्वर्या राय बच्चन, चियान विक्रम, जयम रवी, त्रिशा कृष्णन आणि कार्ती यांसारख्या स्टार्सने सजलेल्या 'PS-1' नं पहिल्या दिवशी जगभरात ७८ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. 'पोन्नियिन सेल्वन-पार्ट १' ने पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये ३६.५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी त्यात थोडी घसरण झाली. 'PS-1' ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी सर्व भाषांमध्ये ३४.६ कोटी रुपयांचा बिझनेस केला.

पहिल्या दिवसाच्या तुलनेत पोन्नियिन सेल्वन पार्ट १ ची कमाई दुसऱ्या दिवशी कमी झाली असली तरी हा आकडा इतका वाईट नाही. 'पोन्नियिन सेल्वन-१' हा मूळचा तमीळ भाषेत बनवला आहे. पहिल्या दिवशी तमीळ व्हर्जनमधून २९.५५ कोटींची कमाई झाली, पण दुसऱ्या दिवशी त्याची कमाई तामिळ व्हर्जनमधून घसरली. दुसऱ्या दिवशी, PS-1 ने तमिळ आवृत्तीतून २७.६ कोटी रुपये कमावले. त्याचप्रमाणे या चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनच्या कमाईतही घट झाली आहे.


सर्व भाषांमधील 'पोन्नियिन सेल्वन कलेक्शन'च्या दोन दिवसांच्या कमाईचा आकडा ७११ कोटींवर पोहोचला आहे. त्यानुसार हा चित्रपट रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत १०० कोटींचा टप्पा ओलांडू शकतो. त्याचवेळी 'PS-1'ने पहिल्या दिवशी हिंदी व्हर्जनमधून दोन कोटींची कमाई केली. मात्र दुसऱ्या दिवशी हिंदी आवृत्तीतून चित्रपटाच्या कमाईत थोडी वाढ झाली आहे. पण तरीही हा आकडा खूपच कमी आहे. हिंदीचे प्रेक्षक 'पोन्नियिन सेल्वन १' मध्ये फारसा रस घेत नसल्याचे दिसते. 'पोन्नियान सेल्वन १' ने दुसऱ्या दिवशी २.८५ कोटींची कमाई केली. त्याचप्रमाणे, मल्याळम भाषेत, 'पोनियान सेल्वन-भाग १' ने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चांगली कमाई केली.


sacnilk नुसार, 'पोन्नियिन सेल्वन १' ने रिलीजच्या दोन दिवसांत देशभरात ७१.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर दोन दिवसांत जगभरात १५३.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच जगभरात या चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला आहे.

Web Title: PS1 Box Office Day 2: 'Ponniyin Selvan 1' is a smash hit, grossing so many crores across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.