'हा' अभिनेता वाढवणार सारा अली खान आणि रणवीर सिंगच्या अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 13:27 IST2018-03-24T07:57:53+5:302018-03-24T13:27:53+5:30
रणवीर सिंगचा आगामी चित्रपट सिम्बाची स्टार कास्ट फायनल करण्यात आली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने रणवीरच्या अपोझिट सारा अली खानच्या ...

'हा' अभिनेता वाढवणार सारा अली खान आणि रणवीर सिंगच्या अडचणी
र वीर सिंगचा आगामी चित्रपट सिम्बाची स्टार कास्ट फायनल करण्यात आली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने रणवीरच्या अपोझिट सारा अली खानच्या नावाची घोषणा केली आहे. स्पॉटब्वॉय डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार चित्रपट व्हिलेनचे काम आर.माधवन करणार आहे. माधवन दोन वर्षानंतर सिल्वर स्क्रिनवर कमबॅक करणार आहे. नुकताच माधवन अमेझॉन प्राईमच्या वेब सिरिज ब्रीथमध्ये दिसला होता.
2016 मध्ये आलेला चित्रपट साला खडूसमध्ये आर माधवन होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ठिक-ठाक गल्ला जमावला होता. आता तो सिम्बामध्ये नेगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. ‘सिम्बा’ हा चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘टेम्पर’मध्ये ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री काजल अग्रवाल लीड रोलमध्ये होते. ‘सिम्बा’मध्ये ज्युनिअर एनटीआरची जागा रणवीर घेणार आहे. चित्रपटाची हिरोईन मात्र अद्याप फायनल झालेली नाही. सध्या अनेक अभिनेत्रींची नावे या चित्रपटासाठी चर्चेत आहेत.
याआधी माधवनला ऐश्वर्या राय बच्चनच्या 'फन्ने खाँ'ची ऑफर आली होती. आर. माधवन आणि ऐश्वर्याचा रोमांस पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स उत्सुक होते. मात्र आर. माधवनला या चित्रपटासाठी केवळ 15 दिवस शूट करायचे होते मात्र यासाठी त्यांने 1. 5 कोटी मागितले. याच दरम्यान राजकुमार राव हीच भूमिका साकारण्यासाठी कमी मानधनात तयार झाला. त्यामुळे राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी राजकुमारची निवड केली. मात्र माधवनने डेट्स नसल्यामुळे ओमप्रकाश मेहरा यांचा 'फन्ने खाँ' करु शकलो नसल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार माधवन अजय देवगणच्या चित्रपट कॅमियो करणार आहे. माधनच्या कॅमबॅकची वाट त्याचे चाहते अनेक दिवसांपासून पाहतायेत.
रहेना हैं तेरे दिल में या सिनेमातून त्याने बॉलीवुडमध्ये एंट्री केली. पहिल्याच सिनेमातील आपल्या अभिनयाने माधवनने रसिकांची मने जिंकली. याशिवाय थ्री इडियट्स, रंग दे बसंती, दिल विल प्यार व्यार, तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु रिटर्नस, गुरु अशा विविध सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.