प्रियांका न्यूयॉर्कच्या रस्त्यावर थिरकते तेव्हा...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 12:06 IST2016-09-10T06:36:01+5:302016-09-10T12:06:01+5:30
बॉलिवूडमध्ये यश मिळविल्यानंतर हॉलिवूडपर्यंत मजल मारणारी आणि आंतरराष्ट्रीय अभिनेत्रीचा दर्जा मिळविणारी प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेत स्थायिक आहे. तिथेच ती नवनवीन ...

प्रियांका न्यूयॉर्कच्या रस्त्यावर थिरकते तेव्हा...!
अमेरिकेत सुरू असलेल्या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये प्रियांका खूप व्यस्त आहे. ती तिथे फॅशन आयकॉन आहे. या फॅशन वीकमध्ये अनेक नावाजलेले आंतरराष्ट्रीय कलाकार आपली हजेरी लावलेली आहे.
तिच्याबरोबर झेकची मॉडेल केरोलिना कुकोर्वा ही देखील उपस्थित आहे. केरोलिनाने तिचा प्रियांकाबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जिथे दोघी पाठीला पाठ लावून उभ्या आहेत. हा व्हिडिओ एका अॅपच्या सहाय्याने बनवला आहे. कुकोर्वाने या व्हिडिओला कॅप्शनही सुरेख दिले आहे. ती म्हणते, शेकिंग थिग्ज् अप विथ प्रियांका चोप्रा अॅट अॅनव्हायएफडब्ल्यू. आपणही हा व्हिडीओ पाहून थिरकायला विसरणार नाही हे नक्की !!
Shaking things up with @priyankachopra at #NYFW! Both wearing @thakoon new Fall Line #FashionWeek#NewYork#Thakoonpic.twitter.com/hXePGR2ffL— Karolina Kurkova (@karolinakurkova) September 9, 2016