​प्रियांकाने हृतिकला दिला नकार, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 16:20 IST2016-10-25T16:20:53+5:302016-10-25T16:20:53+5:30

प्रियांकाने ‘काबील’मध्ये आयटम नंबर करावा, अशी हृतिक रोशनची इच्छा होती. हृतिकने प्रियांकाना तशी आॅफरही दिली. पण प्रियांकाने हृतिकला स्पष्ट ...

Priyanka denies giving Hrithik, but why? | ​प्रियांकाने हृतिकला दिला नकार, पण का?

​प्रियांकाने हृतिकला दिला नकार, पण का?

रियांकाने ‘काबील’मध्ये आयटम नंबर करावा, अशी हृतिक रोशनची इच्छा होती. हृतिकने प्रियांकाना तशी आॅफरही दिली. पण प्रियांकाने हृतिकला स्पष्ट नकार दिला. आता यामागे कारण म्हणजे, प्रियांकाला तिची मार्केट व्हॅल्यू कमी करायची नव्हती. प्रियांका तिच्या करिअरमध्ये बरीच पुढे निघून गेली आहे.  एक आंतरराष्ट्रीय अभिनेत्री म्हणून स्वत:ची नवी ओळख निर्माण करण्यात ती बºयापैकी यशस्वी झाली आहे. अशावेळी कुणी तिच्याकडून आयटम नंबर करून घेण्याची अपेक्षा करीत असेल तर काय होणार, हे तुम्हालाही कळू शकते. होय,स्पष्ट नकार.
‘कृष’ सीरिजनंतर राकेश रोशन व प्रियांका यांचे संबंध अधिकच घट्ट झाले आहेत. याचमुळे राकेश यांनी ‘काबील’साठी आयटम सॉन्ग प्लान केले तेव्हा यासाठी त्यांच्या डोक्यात सर्वप्रथम प्रियांकाचे नाव आले. मग काय, त्यांनी प्रियांकाला चक्क आॅफरच देऊन टाकली.यासाठी प्रियांका म्हणेल ते मानायला ते तयार होते. पण शेवटी प्रियांका काही दूधखुळी नाहीच. हॉलिवूडनंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा पदार्पण करायचे तर प्रियांका कुठल्याशा मोठ्या प्रोजेक्टद्वारे करेल. आयटम साँगद्वारे बॉलिवूडमध्ये परतण्याचा निर्णय ती कशाला घेईल? मग काय??  तिने बिझी असल्याचा बहाणा करीत ही आॅफर नम्रपणे नाकारली.
 येत्या डिसेंबरमध्ये हातातले सगळे हॉलिवूड प्रोजेक्ट संपपल्यानंतर प्रियांका भारतात परतणार आहे. यानंतर राकेश ओम प्रकाश मेहरा निर्मित ‘फन्ने खान’ या चित्रपटात प्रियांका दिसणार असल्याची चर्चा आहे. मेहरा यांनी प्रियांकाला या चित्रपटाची कथा ऐकवली होती. तिला ती चांगलीच आवडल्याचे कळतेय. ‘फन्ने खान’ एक म्युझिकल लव्ह स्टोरी असणार आहे.

 

 

Web Title: Priyanka denies giving Hrithik, but why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.