​ लेकीच्या ‘त्या’ ड्रेसवर बोलली प्रियांका चोप्राची आई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 16:09 IST2017-07-11T10:38:36+5:302017-07-11T16:09:09+5:30

बर्लिन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट प्रियांका चोप्राच्या काहीशा मनस्तापाचे (?)कारण ठरली होती. या भेटीदरम्यान प्रियांकाने घातलेला  तोकडा ...

Priyanka Chopra's mother spoke on 'That' dress of Leki | ​ लेकीच्या ‘त्या’ ड्रेसवर बोलली प्रियांका चोप्राची आई!

​ लेकीच्या ‘त्या’ ड्रेसवर बोलली प्रियांका चोप्राची आई!

्लिन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट प्रियांका चोप्राच्या काहीशा मनस्तापाचे (?)कारण ठरली होती. या भेटीदरम्यान प्रियांकाने घातलेला  तोकडा ड्रेस वादाचा विषय ठरला होता. यावरून प्रियांका सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. काही महिन्यांपूर्वी प्रियांका तिच्या हॉलिवूड फिल्मच्या प्रमोशनसाठी बर्लिनला गेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्लिन येथे असल्याचे कळल्यावर प्रियांकाने त्यांची तेथे भेट घेतली होती.  ‘अविस्मरणीय क्षण’, असे या भेटीचे वर्णन करत प्रियांकाने मोदींबरोबरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.   प्रियांकाच्या मोदींसोबतच्या या फोटोला हजारो लाईक्स मिळाले होते. पण तेवढाच हा फोटो अनेकांना खटकलाही होता. देशाच्या पंतप्रधानांना भेटताना प्रियांकाने असा शॉर्ट ड्रेस घालायला नको होता, असा सल्ला अनेकांनी यानंतर प्रियांकाला दिला होता. यावरून मग प्रियांका सोशल मीडियावर बरीच ट्रोल झाली होती.



प्रियांका या विषयावर अद्यापही काहीही बोललेली नाही. पण प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी मात्र या विषयावर मौन तोडले आहे. पंतप्रधानांच्या भेटीवेळी प्रियांकाचा ड्रेस व्यवस्थित होता, पूर्ण बाह्यांचे कपडे तिने घातले होते. प्रियांकाचे इतर कार्यक्रम आधीच ठरलेले असल्यामुळे तिला कपडे बदलायला वेळ मिळाला नाही. शिवाय ड्रेस बदलून साडी नेसण्यासाठीही ती त्यांच्याकडे वेळ मागू शकत नव्हती. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रोटोकॉल अधिकाºयांना प्रियांकाच्या ड्रेससंदर्भात काहीच तक्रार नव्हती. आपल्या कपड्यांच्या बाबतीत प्रियांका नेहमीच सजग असते. औपचारिक, अनौपचारिक भेटी, रेड कार्पेट कार्यक्रमांसाठीही ती एक दिवसाआधी तिचे कपडे विचारपूर्वक निवडते. इतकेच नाही तर एअरपोर्टवरही तिच्या लूकबाबत विशेष काळजी घेते, असे मधू चोप्रा यांनी म्हटले आहे. 

Web Title: Priyanka Chopra's mother spoke on 'That' dress of Leki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.