सलमान खानच्या 'भारत'मधून प्रियांका चोप्राचा पत्ता कट्ट, 'या' अभिनेत्रीची होऊ शकते एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 16:46 IST2018-04-02T11:16:38+5:302018-04-02T16:46:38+5:30

सलमान खानचा आगामी चित्रपट भारत हा बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या रिलीज होण्याची वाट फक्त रसिक नाही ...

Priyanka Chopra's' Katt 'from Salman Khan's' India', can be an actress' entry | सलमान खानच्या 'भारत'मधून प्रियांका चोप्राचा पत्ता कट्ट, 'या' अभिनेत्रीची होऊ शकते एंट्री

सलमान खानच्या 'भारत'मधून प्रियांका चोप्राचा पत्ता कट्ट, 'या' अभिनेत्रीची होऊ शकते एंट्री

>सलमान खानचा आगामी चित्रपट भारत हा बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या रिलीज होण्याची वाट फक्त रसिक नाही तर सलमान खान आणि अली अब्बास जफरपण कधीपासून बघतायेत. भाईजानचा हा चित्रपट एक सुपरहिट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे बोलले जाते आहे. 
 
जर चित्रपटातील अभिनेत्रीबाबत बोलायचे झाले तर रोज नवी नवी नाव समोर येतायेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातू देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता या चित्रपटातून प्रियांका पत्त कट झाल्याची चर्चा आहे. 
 
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार 'भारत'च्या निर्मात्यांनी प्रियांका चोप्राच्या नावाचा विचार बंद केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भारतमध्ये सलमानसोबत कॅटरिना कैफ दिसणार आहे. मात्र याबाबतची अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही. मुंबई मिररने जेव्हा कॅटरिनाला यासंदर्भात प्रश्न विचारला त्यावेळी तिने उत्तर देण्यास नकार दिला. जर कॅटरिना हा चित्रपट साईन केला तर सलमानसोबत स्क्रिन शेअर करण्याची तिचा आठवी वेळ असेल. दोघांची केमिस्ट्री रसिकांनी 'टायगर जिंदा है' मध्ये बघितली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झालाच पण रसिकांना यांच्या जोडीला ही पसंती दिली. आशा आहे की भारतमध्ये सुद्धा सलमान आणि कॅटची जोडी प्रेक्षकांना भावेल आणि 'टायगर जिंदा है'च्या इतिहासाची बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा पुनरावृत्ती होईल.

ALSO READ :  कॅटरिनाच्या बहिणीसाठी ‘इतना तो बनता है’! ‘ओ ओ जाने जाना...’ घेऊन पुन्हा येतोय सलमान खान...!!    
 
'भारत'ची शूटिंग या वर्षाच्या मिडपर्यंत सुरू होऊ शकते. सध्या अली लंडनमध्ये चित्रपटाच्या लोकेशनसाठी फिरतो हे.अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या चित्रपटाचे प्लानिंग करतोय. यात सलमान 18 वर्षांचा दिसणार आहे. ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. 

Web Title: Priyanka Chopra's' Katt 'from Salman Khan's' India', can be an actress' entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.