प्रियंका चोपडाचा झाला संताप; चक्क डोक्यावर फोडला ग्लास, पाहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 15:09 IST2018-02-24T09:39:36+5:302018-02-24T15:09:43+5:30

प्रियंका चोपडा सध्या तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. अशात तिचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये ती चक्क डोक्यावर ग्लास फोडताना दिसत आहे.

Priyanka Chopra's fury; Scratched glass on the head, watch the video! | प्रियंका चोपडाचा झाला संताप; चक्क डोक्यावर फोडला ग्लास, पाहा व्हिडीओ!

प्रियंका चोपडाचा झाला संताप; चक्क डोक्यावर फोडला ग्लास, पाहा व्हिडीओ!

लिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविणारी प्रियंका चोपडा सध्या तिच्या रागामुळे चर्चेत आहे. तिचा प्रचंड संतापात असलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात प्रियंकाचे एक्सप्रेशन खूपच रागीट दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रियंका रागाच्या भरात चक्क डोक्यावर काचेचा ग्लास फोडताना दिसत आहे. सध्या प्रियंकाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, चाहत्यांना तिचा हा अवतार बघून धक्का बसला नसेल तरच नवल. 

असे म्हटले जात आहे की, क्वांटिको गर्ल प्रियंकाने रागाच्या भरातच डोक्यावर ग्लास फोडला आहे. सध्या प्रियंका तिच्या न्यूयॉर्कस्थित घरी सुट्या एन्जॉय करीत आहे. प्रियंकाच्या या व्हिडीओमध्ये ती एका काचेच्या ग्लासात वाइन पिताना दिसत आहे. मात्र अचानकच तिला असा काही राग येतो की, चक्क ती तो ग्लास स्वत:च्याच डोक्यावर फोडते. प्रियंका डोक्यावर ग्लास फोडताच बॅकग्राउंडमध्ये एक इंग्रजी म्युझिक ऐकायला मिळते. 
 

प्रियंकाने हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये आपल्या मनातील भावना लिहिल्या. ‘असे तेव्हा घडते जेव्हा नाइन ते वाइनपर्यंत काम केले जाते. यास घरी करण्याचा अजिबातच प्रयत्न केला जाऊ नये.’ प्रियंका चोपडा सध्या तिच्या आगामी ‘क्वांटिको’च्या सीजन ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर ती काही हॉलिवूडपटांवरही काम करीत आहे. 

Web Title: Priyanka Chopra's fury; Scratched glass on the head, watch the video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.