प्रियांका चोप्राच्या साखरपुड्याला अनुष्का शर्मा होती उपस्थित, हा घ्या पुरावा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 13:55 IST2018-08-21T13:53:57+5:302018-08-21T13:55:52+5:30
प्रियांका चोप्राच्या साखरपुड्याला केवळ प्रियांका आणि निकच्या कुटुंबियातील जवळची मंडळी हजर असल्याचे मीडियाद्वारे सांगण्यात आले होते. पण त्यांच्या साखरपुड्याला बॉलिवूडमधील केवळ एक अभिनेत्री उपस्थित होती.

प्रियांका चोप्राच्या साखरपुड्याला अनुष्का शर्मा होती उपस्थित, हा घ्या पुरावा...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या साखरपुड्यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. त्यांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील त्यांच्या साखरपुड्याला उपस्थित होती. प्रियांका चोप्राच्या साखरपुड्याला केवळ प्रियांका आणि निकच्या कुटुंबियातील जवळची मंडळी हजर असल्याचे मीडियाद्वारे सांगण्यात आले होते. पण त्यांच्या साखरपुड्याला बॉलिवूड मधील केवळ एक अभिनेत्री उपस्थित होती. ही अभिनेत्री दुसरी कोणीही नसून अनुष्का शर्मा आहे.
अनुष्का आणि प्रियांकाने दिल धडकने दो या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यामुळेच प्रियांका आणि अनुष्काची चांगली मैत्री असल्याने प्रियांकाने अनुष्काला आमंत्रित केले असल्याचे तुम्हाला वाटत असेल. पण असे नाहीये... अनुष्काचा सुई धागा या चित्रपटातील फोटो एडिट करून तो प्रियांका आणि निकच्या साखरपुड्याच्या फोटोत टाकण्यात आला आहे. त्या दोघांच्या बाजूलाच अनुष्का सुई धागा या चित्रपटातील लूकमध्ये बसलेली दिसत आहे. त्यामुळे अनुष्का देखील साखरपुड्याला उपस्थित होती असे सोशल मीडियावर जोक्स फिरत आहेत.
वरुण धवन आणि अनुष्का शर्माच्या आगामी 'सुई धागा' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली. पण यातूनही अनुष्काला ट्रोल करण्याची किंवा तिच्यावर जोक्स करण्याची संधी प्रेक्षकांनी सोडली नाहीये. या सिनेमातील अनुष्काचा फोटो घेऊन त्यावर भन्नाट जोक्स तयार करण्यात आले आहेत. यशराज बॅनरखाली तयार झालेल्या 'सुई धागा' सिनेमाचं दिग्दर्शन शरत कटारियाने केलं आहे. शरतने याआधी 'दम लगा के हईशा' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होता. हा सिनेमा २८ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
बॉलिवूडमध्ये एखादा खास इव्हेंट झाला आणि नेटकऱ्यांनी त्यावर मीम्स बनवले नाहीत, हे शक्यच नाही. यावेळी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर सुई धागा या चित्रपटातील अनुष्का शर्मा आहे. नेटिझन्सने सुईधागा या चित्रपटातील अनुष्काच्या लूकवर अनेक जोक्स तयार केले असून ते व्हायरल होत आहेत.