प्रियांका चोप्रा करणार अमीर खानसोबत रोमांस ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 10:33 IST2017-09-04T04:45:38+5:302017-09-04T10:33:33+5:30

प्रियांका चोप्रा ही ग्लोबल आयकॉन बिनली आहे. ती बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये ही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण ...

Priyanka Chopra romance with Amir Khan? | प्रियांका चोप्रा करणार अमीर खानसोबत रोमांस ?

प्रियांका चोप्रा करणार अमीर खानसोबत रोमांस ?

रियांका चोप्रा ही ग्लोबल आयकॉन बिनली आहे. ती बॉलिवूडप्रमाणे हॉलिवूडमध्ये ही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. एकमागो माग एक असे अनेक चित्रपट तिने हॉलिवूडचे साईन केले आहेत. प्रियांकाचे फॅन्स तिला बॉलिवूडमध्ये बघण्याल आतुरत झाले आहेत. प्रियांका गुस्ताखियाँ चित्रपटात दिसणार होती. याच चित्रपटातील हिरोच्या शोधासाठी प्रियांका भारतात आली होती. मात्र याच चित्रपटाशी संदर्भात आता आणखीन एक बातमीसमोर येतेय हा चित्रपट तारख्यांमुळे ती करु शकत नाही. प्रियांका आता आमीरसोबत चित्रपटात दिसणार आहे.  

डीएनएमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार प्रियांका आमीरचा चित्रपट 'सैल्यूट'मध्ये दिसणार आहे. यात आमीर खान अंतराळवीर राकेश शर्मा यांची भूमिका साकारणार आहे. याच चित्रपटात प्रियांका त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याचे दिग्दर्शन महेश मथाई करणार आहेत. हा चित्रपट जर प्रियांकाने साईन केला तर पहिल्यांदा दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका भारतात आली होती तेव्हा ती या चित्रपटातील अभिनेत्याचे नाव फायनल करण्यासाठी आली होती. हा चित्रपट अमृता प्रीतम यांच्या आयुष्यावर आधारित आहे. यात अमृता यांची भूमिका प्रियांका साकारणार असल्याची चर्चा होती. यातला हिरोच्या नावासाठी शाहरुख खान, अभिषेक बच्चन आणि इरफान खान यांच्या नावाची चर्चा होती. प्रियांका लवकरच हॉलिवूडच्या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे.  'अ किड लाइक जेक' आणि 'इट्स इजंट रोमाँटिक' याचित्रपटात ही ती दिसणार आहे. तर आमीर खान सध्या ठग्स ऑफ हिंदुस्तानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Web Title: Priyanka Chopra romance with Amir Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.