शाहरुख खाननंतर प्रियांका चोप्रा दिलीप कुमार यांच्या भेटीला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 11:42 IST2017-09-05T06:12:37+5:302017-09-05T11:42:37+5:30

अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिनवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. भेटी दरम्यानचे काही फोटो सोशल ...

Priyanka Chopra Dilip Kumar after Shah Rukh Khan! | शाहरुख खाननंतर प्रियांका चोप्रा दिलीप कुमार यांच्या भेटीला !

शाहरुख खाननंतर प्रियांका चोप्रा दिलीप कुमार यांच्या भेटीला !

िनेत्री प्रियांका चोप्राने बॉलिनवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. भेटी दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससोबत दिलीप कुमार यांनी शेअर केले आहेत. कॅप्शनदेखील देखील देण्यात आले आहे. प्रियांकाने दिलीप साहेब आणि सायराजींसोबत वेळ घालवला. या ट्वीटला प्रियांकानेही रिट्वीट करत उत्तर दिले आहे. ''साहेब आणि सायराजींसोबत काही वेळ घालवला. साहेबांची तब्येत आता बरी आहे. दोघांना भेटून बरं वाटले '' शेअर केलेल्या फोटोंमध्ये सायरा बानूसुद्धा दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच दिलीप कुमार यांना रुग्णलायातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ज्यानंतर अनेक सेलिब्रेटींनी दिलीप साहेबांती घरी जाऊन भेट घेतली. प्रियांकाच्या आधी शाहरुख खानने देखील जाऊन त्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती. शाहरुखने ही आपल्या फॅन्ससोबत भेटी दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.  

प्रियांका सध्या आपल्या हॉलिवूड प्रोजेक्टमधून ब्रेक घेऊन मुंबईत आली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका आपल्या मित्रांसोबत मरिन ड्राईव्हला बसलेली स्पॉट झाली होती. सध्या प्रियांका हॉलिवूडमध्ये बरीच बिझी आहे. 'अ किड लाइक जेक' आणि 'इट्स इजंट रोमाँटिक' या चित्रपटांमध्ये प्रियांका दिसणार आहेत तर नुकताच तिने आणखीन एक हॉलिवू़ चित्रपट साईन केला आहे. यात ती वकिलाची भूमिका साकारणार आहे.  मुबिना रेटोसन प्रियांकाची मैत्रिणी या चित्रपटाची निमिर्ती करणार आहे. तर बेवॉचचा दिग्दर्शक सेठ गॉर्डन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. 

ALSO READ : शाहरुख खानने दिली दिलीप कुमार यांना भेट

संजय लीला भंसाळीच्या गुस्ताखियाँ चित्रपटात प्रियांका दिसणार होती मात्र टेड्समुळे ती हा चित्रपट करत नसल्याचे समजते आहे. प्रियांका 'सैल्यूट'मध्ये आमीर खानच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Priyanka Chopra Dilip Kumar after Shah Rukh Khan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.