​प्रियांकाने दिली प्रांजळ कबुली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 17:35 IST2016-09-10T12:05:35+5:302016-09-10T17:35:35+5:30

प्रियांका चोप्रा रिलेशनशिपमध्ये होती वा नाही, हे आजपर्यंत कोड राहिलेलं आहे. पण ताज्या मुलाखतीत प्रियांकाने या रहस्यावरून काही प्रमाणात ...

Priyanka Chopra confesses! | ​प्रियांकाने दिली प्रांजळ कबुली!!

​प्रियांकाने दिली प्रांजळ कबुली!!

रियांका चोप्रा रिलेशनशिपमध्ये होती वा नाही, हे आजपर्यंत कोड राहिलेलं आहे. पण ताज्या मुलाखतीत प्रियांकाने या रहस्यावरून काही प्रमाणात पडदा उठवलाच. मी रिलेशनशिपमध्ये होती, अशी अप्रत्यक्ष प्रांजळ कबुली तिने दिलीय. होय,  या मुलाखतीत रिलेशनशिपबाबत प्रियांकाला प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रियांकाने अगदी प्रामाणिक उत्तर दिले.  एखादी गोष्ट माझी आहे, असे मला वाटते तेव्हा मी ती जीवापाड जपते. मी रिलेशनशिपमध्ये नव्हतेच,असे म्हणता येणार नाही. पण माझ्या मते,आता ती त्याठिकाणी उभी आहे, तिथे हे सगळे कठीण आहे, असे प्रियांका म्हणाली. आता प्रियांकाच्या बोलण्यावरून एक साधारण निष्कर्ष तर निघतोच. तो म्हणजे, प्रियांकाच्या मनात कुणीतरी होते. पण ज्यांच्यासोबत तिचे नाव जुळले, ते तिचे नव्हते. त्यामुळेच प्रियांकाने त्यांना जपले नाही.  रिलेशनशिपबाबत प्रियांका आत्ताच बोलू इच्छित नाही. ‘कठीण’ हा शब्द तिने वापरला, याचा अर्थ रिलेशनशिपमध्ये पडण्याची किंवा ते रिलेशनशिप उघड करण्याची ही योग्य वेळ नाही, असेच प्रियांकाला सुचवायचे आहे. लेट्स सी...पण प्रियांका, आम्हाला इतकी प्रतीक्षा करवणे, योग्य नाहीच हं!!

Web Title: Priyanka Chopra confesses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.