‘सडक’च्या रिमेकची तयारी सुरु! संजय दत्त, पूजा भट्ट दिसले एकत्र!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 12:38 IST2017-05-03T07:08:13+5:302017-05-03T12:38:13+5:30
बॉलिवूडचा ‘मुन्नाभाई’ संजय दत्त आणि पूजा भट्ट स्टारर ‘सडक’ या चित्रपटाच्या रिमेकची चर्चा ब-याच दिवसांपासून सुरु आहे. सूत्रांचे खरे ...

‘सडक’च्या रिमेकची तयारी सुरु! संजय दत्त, पूजा भट्ट दिसले एकत्र!!
ब लिवूडचा ‘मुन्नाभाई’ संजय दत्त आणि पूजा भट्ट स्टारर ‘सडक’ या चित्रपटाच्या रिमेकची चर्चा ब-याच दिवसांपासून सुरु आहे. सूत्रांचे खरे मानाल तर, याची तयारी सुरु झाली आहे. या रिमेकमध्ये आलिया भट्ट ही पूजा भट्टच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार असल्याचे कळतेय. चित्रपटाची कथा पुन्हा एकदा संजय दत्तला समोर ठेवून लिहिली जात आहे. जो आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आकाश-पाताळ एक करतो. काल-परवा संजय दत्त, पूजा भट्ट आणि महेश भट्ट असे तिघेही एकत्र दिसले आणि ‘सडक’च्या रिमेकची चर्चा अधिक जोरात सुरु झाली. या तिघांचे फोटो आमच्या हाती लागले आहेत. या फोटोत तिघेही महेश भट्टच्या घरातून बाहेर निघत असताना दिसत आहेत. पूजा भट्ट दीर्घकाळापासून ‘सडक’चा रिमेक येणार, असे संकेत देत आली आहे.
![]()
![]()
ALSO READ : ‘सडक’च्या रिमेकमध्ये संजय दत्तसोबत दिसणार आलिया भट्ट!
१९९१ मध्ये ‘सडक’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. यातील चार्टबस्टर म्युझिक लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने संजय दत्त रातोरात स्टार झाला होता. यात पूजा भट्ट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात संजय दत्त एका वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि यानंतर दलालांपासून तिला वाचवतो, असे दाखवले गेले होते. हीच कथा पुढे नेत ‘सडक’च्या रिमेकमध्ये संजय दत्त व त्याच्या मुलीची भूमिका दाखवली जात आहे. यात पूजा भट्ट फ्लॅशबॅकमध्ये दिसणार आहे. आता ‘सडक’हा रिमेक कसा रंगतो, ते बघूच. तोपर्यंत प्रतीक्षा. काही अपडेट असल्यास आम्ही तुम्हाला कळवूच.