आसराचा प्रिमियर उत्साहात संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 14:22 IST2016-12-06T14:22:45+5:302016-12-06T14:22:45+5:30

कुणी घर देता का घर? असा प्रश्न आप्पासाहेब बेलवलकरांनी नटसम्राट नाटकामधुन केला. मात्र आजही झोपडपट्टील लोक या प्रश्नाचे सरकारकडे ...

The premiere of Asha premiered | आसराचा प्रिमियर उत्साहात संपन्न

आसराचा प्रिमियर उत्साहात संपन्न

णी घर देता का घर? असा प्रश्न आप्पासाहेब बेलवलकरांनी नटसम्राट नाटकामधुन केला. मात्र आजही झोपडपट्टील लोक या प्रश्नाचे सरकारकडे मागत आहेत. दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतर रात्रीच्या विसाव्याला किमान  आसरा मिळावी अशी भावना रूपेरी पडद्यावर दिग्दर्शक राज सागर यांनी मांडली आहे. या चित्रपटात अभिनेता अतुल कुलकर्णी, रघुवीर यादव, अशोक समर्थ या कलाकारांचा समावेश आहे. सत्य घटनेवर आधारित असलेला 'आसरा' हा हिंदी आहे. हा चित्रपट 2 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संवेदनशील कथानक आणि उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा भव्य प्रिमियर शो  मोठ्या उत्साहात पार पडला.'पद्माविजन' या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून सदानंद शेट्टी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा त्यांच्या जीवनातील काही घटनांवर आधारित आहे. पुण्यातील मंगळवार पेठ भागात झोपडपट्टी पुर्नवसन करण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षावर या चित्रपटाच्या माध्यमातुन प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहणाºया झोपडपट्टीधारकांच्या जगण्यावर हा चित्रपट भाष्य करतो, यामुळे आसरा हे टायटल सिनेमाला चपखल बसले आहे.अभिनेता अतुल कुलकर्णी, रघुवीर यादव, अशोक समर्थ, सुनील पाल, ओंकारदास माणिकपुरी अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. चित्रपटाची कथा एम. के. शंकर यांनी लिहिली आहे. पटकथा और दिग्दर्शन राज सागर यांचं आहे. तर संवादलेखन विशुद्ध आनंद शर्मा यांनी केलं आहे. संगीत दिग्दर्शन अबधेश गोस्वामी यांनी केलं असून, रघुवीर यादव, सिद्धार्थ महादेवन, अभिजीत कोसम्बी व अबधेश गोस्वामी यांनी गाणी गायली आहे. कृष्णा सोरेन यांनी छायालेखन, बी. महंतेश्वरयांनी संकलन केलं आहे. चित्रपटाचं पोस्ट प्रॉडक्शन एन डी स्टूडियोमध्ये करण्यात आलं. यावेळी चित्रपटाबाबत बोलताना निमार्ता सदानंद शेट्टी सांगतात, माज्या आयुष्यातील संघर्षावर हा चित्रपट बेतला आहे. स्वत: अनुभवलेल्या घटना या चित्रपटात आहेत. आजही झोपडपट्टीधारक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्याचं चित्रण या चित्रपटात आहे. एआरए सारख्या योजना सरकार बनवत मात्र त्याची अंमलबजावणी कशी व्हायला पाहिजे यासाठी मार्गदर्शक ठरणारा हा सिनेमा आहे. कलाकारांची अचुक निवड आणि संवेदनशील कथानक ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. चित्रपटाचं चित्रीकरण रिअल लोकेशन्सवर करण्यात आलं आहे. 








Web Title: The premiere of Asha premiered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.