प्रतीक बब्बर त्याच्या आईसारखा नव्हे तर हुबेहुब दिसतो त्याच्या मावशीसारखा, पाहा हा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:54 PM2021-05-28T16:54:39+5:302021-05-28T17:01:55+5:30

या फोटोत आपल्याला स्मिता पाटील यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही बहिणींना पाहायला मिळत आहे.

prateik babbar look exactly like her aunt not like mother smita patil | प्रतीक बब्बर त्याच्या आईसारखा नव्हे तर हुबेहुब दिसतो त्याच्या मावशीसारखा, पाहा हा फोटो

प्रतीक बब्बर त्याच्या आईसारखा नव्हे तर हुबेहुब दिसतो त्याच्या मावशीसारखा, पाहा हा फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देप्रतीक त्याच्या आईसारखा नव्हे तर हुबेहुब त्याच्या मावशीसारखा दिसतो.

स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याच्यात स्मिता पाटील यांची झलक असून तो त्याच्या आईसारखा दिसतो असे अनेकजण म्हणतात. पण तो त्याच्या आईसारखा नव्हे तर हुबेहुब त्याच्या मावशीसारखा दिसतो.

स्मिता पाटील यांचा एक जुना फोटो टाईमलेस इंडियन मेलोडिसच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला त्यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही बहिणींना पाहायला मिळत आहे. त्यांचा हा फोटो पाहून स्मिता यांच्या बहिणीप्रमाणेच म्हणजेच आपल्या मावशीप्रमाणे प्रतीक दिसतो असेच तुम्ही म्हणाल. 

13 डिसेंबर 1986 रोजी स्मिता पाटील यांचे निधन झाले. प्रतीकच्या जन्मानंतर काहीच दिवसात स्मितांनी जगाचा निरोप घेतला होता. आईच्या निधनानंतर प्रतीक आपल्या आजीकडे लहानाचा मोठा झाला. या काळात आपल्या वडिलांचा प्रचंड द्वेष करायचा. याच काळात तो ड्रग्जच्या आहारी गेला होता़ अर्थात आज प्रतीक या सगळ्यांतून बाहेर पडला आहे. पण एका मुलाखतीत प्रतीकने खाजगी आयुष्यातील त्या दिवसांबद्दल सांगितले होते.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल खुलासा केला होता. ‘माझ्या वडिलांना माझ्यासाठी वेळ नव्हता. सगळे लोक मला माझ्या आईच्या यशाबद्दल सांगायचे. पण मला त्यामुळे काहीही फरक पडत नव्हता. आई माझ्यासोबत का नाही, या एकाच प्रश्नाने मी बैचेन होतो. वयाच्या 12 व्या वर्षी मी ड्रग्जच्या आहारी गेलो होतो. त्यामुळे एकदा नाही तर दोनदा मला रिहॅब सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. ड्रग्जने मला मरणाच्या दारात उभे केले होते. माझी आजी मला माझ्या आईसारखी होती. पण नातवाचे हाल बघून माझ्या चिंतेने तिने प्राण सोडले. एक दिवसही ड्रग्ज मिळाले नाही की मी अस्वस्थ व्हायचो.

बॉलिवूड अभिनेता प्रतिक बब्बर फार कमी सिनेमात दिसतो. पण ज्यात दिसतो, त्या सिनेमातील दमदार अभिनयानं सर्वांची मनं जिंकतो.

Web Title: prateik babbar look exactly like her aunt not like mother smita patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.