​प्रभास व श्रद्धा कपूरमध्ये झालाय एक करार! जाणून घ्या काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 13:04 IST2017-09-06T07:34:11+5:302017-09-06T13:04:11+5:30

प्रभासला भेटायला मी उतावीळ झालेय... हे आम्ही नाही तर श्रद्धा कपूर म्हणतेय.  प्रभास आणि श्रद्धा दोघेही ‘साहो’ या अ‍ॅक्शन ...

Prabhas and Shraddha Kapoor have a contract! What to Know? | ​प्रभास व श्रद्धा कपूरमध्ये झालाय एक करार! जाणून घ्या काय?

​प्रभास व श्रद्धा कपूरमध्ये झालाय एक करार! जाणून घ्या काय?

रभासला भेटायला मी उतावीळ झालेय... हे आम्ही नाही तर श्रद्धा कपूर म्हणतेय.  प्रभास आणि श्रद्धा दोघेही ‘साहो’ या अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. लवकरच श्रद्धा या चित्रपटाचे शूटींग सुरू करेल. म्हणजेच प्रभास व श्रद्धा अद्याप एकमेकांना भेटलेले नाहीत. पण न भेटताच त्यांच्यात एक करार झाल्याची खबर आहे. होय, प्रभास व श्रद्धा दोघांमध्येही एक तोंडी करार झाला आहे. हा करार काय? तर पुढे वाचा.
आता श्रद्धाला तेलगू येत नाही आणि प्रभासला हिंदी येत नाही, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. पण एकत्र काम करायचे म्हटल्यावर दोघांनाही एकमेकांची भाषा कळायला हवी ना. नेमक्या याच विषयावर दोघांमध्ये करार झाला आहे. हा करार काय तर दोघांनी एकमेकांना आपआपली भाषा शिकवायची. म्हणजे, श्रद्धा प्रभासला हिंदी शिकवणार आणि प्रभास श्रद्धाला हिंदी. सूत्रांनी दिलेली माहिती खरी मानाल तर, ‘साहो’चे निर्माते श्रद्धा व प्रभास दोघांनाही प्रोफेशनल ट्यूटर उपलब्ध करून देणार आहेत. 

ALSO READ : प्रभासची हिरोईन बनण्यासाठी श्रद्धा कपूरला करावे लागणार ‘हे’ काम!

‘साहो’ या चित्रपटासाठी आधी अनेक अभिनेत्रींची नावे चर्चेत होती. सर्वप्रथम अनुष्का शेट्टी, नंतर दिशा पटनी, पूजा हेगडे अशा अनेकींची. पण सरतेशेवटी या चित्रपटात  श्रद्धाची वर्णी लागली. गत महिन्यात टिष्ट्वटरवर श्रद्धाने ‘साहो’ साईन केल्याची माहिती दिली होती. प्रभाससोबत काम करण्यास श्रद्धा कमालीची एक्ससाईटेड आहे, हे तिने तेव्हाही बोलून दाखवले होते आणि ताज्या मुलाखतीतही ती हेच बोलली. मी अद्याप प्रभासला भेटलेली नाही. त्याला भेटायला मी आतूर आहे. अर्थात आमच्यात फोन आणि चॅटींग सुरु झाले आहे. याच महिन्यात आम्ही शूटींग सुरु करणार आहोत, असे ती म्हणाली.

Web Title: Prabhas and Shraddha Kapoor have a contract! What to Know?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.