पूनम ढिल्लोन यांचे या प्रसिद्ध निर्मात्यासोबत झाले होते लग्न, काहीच वर्षांत घेतला घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 15:42 IST2018-04-18T10:12:11+5:302018-04-18T15:42:11+5:30

पूनम ढिल्लोन यांनी खूपच कमी वयात त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. केवळ १६ वर्षांची असताना त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. पूनम ...

Poonam Dhillon was married to the famous producer, married and divorced in some years | पूनम ढिल्लोन यांचे या प्रसिद्ध निर्मात्यासोबत झाले होते लग्न, काहीच वर्षांत घेतला घटस्फोट

पूनम ढिल्लोन यांचे या प्रसिद्ध निर्मात्यासोबत झाले होते लग्न, काहीच वर्षांत घेतला घटस्फोट

>पूनम ढिल्लोन यांनी खूपच कमी वयात त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. केवळ १६ वर्षांची असताना त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. पूनम या मिस इंडिया झाल्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलले. एका मासिकावर पूनम यांचा फोटो झळकला होता. हा फोटो यश चोप्रा यांनी पाहिला आणि त्रिशुल या चित्रपटासाठी त्यांनी पूनम यांची निवड केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. पहिल्याच चित्रपटात संजीव कुमार, अमिताभ बच्चन या दिग्गजांसोबत झळकण्याची संधी पूनम यांना मिळाली होती. या चित्रपटात त्यांची जोडी सचिन पिळगांवकर यांच्यासोबत जमली. त्या दोघांवर चित्रीत झालेले गुपुची गुपुची गम गम हे गाणे चांगलेच गाजले होते. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
पूनम ढिल्लोन या त्या काळातील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी त्रिशूल या त्यांच्या पहिल्याच चित्रपटात स्विमिंग सूट घातला होता. तसेच गिरफ्तार या चित्रपटातही त्या स्विमिंग सूट मध्ये दिसल्या. पूनम यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. पण त्यांचे खाजगी आयुष्य हे चांगलेच वादात राहिले. नूरी या चित्रपटाचे लेखक आणि प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश तलवार यांच्यासोबत पूनमची असलेली मैत्री त्या काळात मीडियात चांगलीच गाजली होती. ते त्याकाळात यश चोप्रा यांच्यासोबत काम करत होते. त्याचवेळी त्यांची पूनमसोबत ओळख झाली होती. ऋषी कपूर आणि पूनम यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी काही पत्रकार फोटो काढण्यासाठी सेटवर गेले होते. त्यावेळी ऋषीला पूनम यांच्या जवळ बसायला पत्रकारांनी सांगितले त्यावर पूनम ही रमेश तलवार यांची एक्सक्ल्यूझिव्ह प्रॉपर्टी आहे असे वक्तव्य त्याने केले होते. पण काही कारणांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्यानंतर पूनम यांचे नाव रमेश सिप्पी यांच्यासोबत देखील जोडण्यात आले. पण हे नाते देखील जास्त काळ टिकू शकले नाही. त्यांनी निर्माते अशोक ठकेरियासोबत लग्न केले. त्या दोघांनी ओळख एका होली पार्टीमध्ये झाली होती. त्या होळीच्या काहीच महिने आधी पूनम यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे होळी साजरी करायची नाही असेच त्यांनी ठरवले होते. पण काही मित्रांच्या आग्रहास्तव त्या एका होळी पार्टीला गेल्या होत्या. तिथे पूनम यांना पाहाताच क्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले. काहीच दिवसांत त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्न झाल्यानंतर त्यांनी अभिनय करण्याचे देखील सोडले. त्यांना एक मुलगा आणि मुलगी देखील आहे. पण लग्नाच्या काहीच वर्षांत त्यांनी घटस्फोट घेतला. अशोक हे चित्रपटांची निर्मिती करण्यासोबतच अभिनय देखील करतात. 

ashok thakeria

Also Read : पूनम ढिल्लोने यश चोप्रांना ठेवले होते अनेक दिवस ताटकळत!
 
 

Web Title: Poonam Dhillon was married to the famous producer, married and divorced in some years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.