तैमुर अली खान सेम टू सेम दिसतो सैफ अली खानसारखा, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:13 AM2020-03-13T10:13:32+5:302020-03-13T10:14:21+5:30

सैफ अली खानचा लहानपणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Pic of Baby Saif Ali Khan Looking Exactly Like Taimur Ali Khan Goes Viral PSC | तैमुर अली खान सेम टू सेम दिसतो सैफ अली खानसारखा, हा घ्या पुरावा

तैमुर अली खान सेम टू सेम दिसतो सैफ अली खानसारखा, हा घ्या पुरावा

googlenewsNext
ठळक मुद्देया फोटोंमधील तैमुर आणि सैफ यांची हेअर स्टाईल अगदी सेम टू सेम आहे. एवढेच नव्हे तर दोघांची स्माईल देखील अगदी सारखी असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

करिना कपूर आणि सैफ अली खानचा लेक तैमुर अली खान माध्यमांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याच्या जन्मापासूनच बॉलिवुड आणि मीडियामध्ये त्याची चर्चा असते. तैमुरची कोणतीही गोष्ट लगेच बातमी बनते. तैमुर हा दिसायला करिनाच्या कुटुंबियांप्रमाणे आहे असे अनेकवेळा म्हटले जाते. तो अगदी ऋषी कपूर यांच्यासारखा दिसत असल्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाले होते. पण तैमुर कपूर कुटुंबियांतील कोणत्या सदस्याप्रमाणे नव्हे तर अगदी त्याचे वडील सैफ अली खान सारखा दिसतो.

सैफ अली खानचा लहानपणीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. करिना कपूरच्या फॅन पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोंमधील तैमुर आणि सैफ यांची हेअर स्टाईल अगदी सेम टू सेम आहे. एवढेच नव्हे तर दोघांची स्माईल देखील अगदी सारखी असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर काहीच तासांच दोन लाखांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे तर दोन हजारांहून अधिकांनी या फोटोवर कमेंट केले आहे. सैफ अली खानच्या बालपणीच्या फोटोची आणि तैमुरच्या आताच्या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

सैफ अली खान आणि करिना कपूर खानचा मुलगा तैमुर अली खान खानचे स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरदिवशी तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टीपण्यासाठी पुढे सरसावतात. त्याचे हे फोटो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतात. अर्थात अनेक लोक तैमूरला दिल्या जाणाऱ्या अवास्तव प्रसिद्धीबद्दल टीकाही करतात. पण या टीकेची पर्वा करिना आणि सैफ कधीच करत नाहीत. 

Web Title: Pic of Baby Saif Ali Khan Looking Exactly Like Taimur Ali Khan Goes Viral PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taimurतैमुर