‘स्टुडेंट आॅफ द ईयर-२’च्या सेटवरील एक फोटो होतोय व्हायरल, तुम्हीही पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 13:36 IST2018-04-29T07:39:36+5:302018-04-29T13:36:46+5:30
करण जोहरच्या ‘स्टुडेंट आॅफ द ईयर-२’ या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो व्हायरल होत असून, त्यामध्ये अनन्या पांडे आणि तारा सूतारिया दिसत आहेत.
(1).jpg)
‘स्टुडेंट आॅफ द ईयर-२’च्या सेटवरील एक फोटो होतोय व्हायरल, तुम्हीही पाहा!
ध ्मा प्रॉडक्शनच्या ‘स्टुडेंट आॅफ द ईयर-२’ची शूटिंग मसूरी येथील भट्टागाव येथे सुरू आहे. या अगोदर चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शूटिंग देहरादून येथे करण्यात आले. सध्या चित्रपटात चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सूतारिया हे दोन नवे चेहरे चर्चेत आहेत. यादरम्यान, दोघींचा सेटवरील एक फोटो समोर आला असून, सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक पुनित मल्होत्राने अनन्या आणि ताराचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला. या फोटोमध्ये दोघीही खूपच क्यूट दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये पुनितने लिहिले की, ‘स्टुडेंट थंडीशी संघर्ष करीत आहेत.’
तुमच्या माहितीसाठी अनन्या आणि तारा दोघीही सध्या खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत. हे सांगण्याचे कारण असे की, सुरुवातीला अशा बातम्या समोर येत होत्या की, या दोघींचे अजिबातच पटत नाही. या दोघी सेटच्या दोन वेगवेगळ्या दिशेला तोंड करून बसणे पसंत करतात. परंतु आता समोर आलेल्या या फोटोवरून या सर्व अफवा होत्या, असेच म्हणावे लागेल. दोघी खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या असून, त्यांच्यातील ट्युनिंग फोटोवरून स्पष्टपणे दिसून येते.
चित्रपटाच्या सूत्राने सांगितले की, पुढील दोन महिने चित्रपटाची शूटिंग देहरादून, मसूरी आणि ऋषीकेश येथे होणार आहे. त्यानंतर पुण्याच्या एका कॉलेजमध्ये चित्रपटाची शूटिंग होणार आहे. दरम्यान, या दोघींव्यतिरिक्त अभिनेता टायगर श्रॉफही या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात बघावयास मिळणार आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांचे फर्स्ट लूक समोर आले असल्याने, चाहत्यांना आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा लागली आहे.