शाहरुख खानच्या 'पठाण'ची ऐतिहासिक कामगिरी! १००० कोटींच्या क्लबमध्ये धमाकेदार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:33 PM2023-02-21T12:33:18+5:302023-02-21T13:08:35+5:30

शाहरुख खान दीपिका पादुकोण स्टारर 'पठान' चित्रपटाने इतिहास रचला! या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्डही मोडले आहेत. आता या चित्रपटाच्या लेटेस्ट कमाईचा आकडा समोर आला आहे.

Pathaan worldwide box office collection 1000 cr shahrukh khan movie crossed with new record | शाहरुख खानच्या 'पठाण'ची ऐतिहासिक कामगिरी! १००० कोटींच्या क्लबमध्ये धमाकेदार एंट्री

शाहरुख खानच्या 'पठाण'ची ऐतिहासिक कामगिरी! १००० कोटींच्या क्लबमध्ये धमाकेदार एंट्री

googlenewsNext

Pathaan Worldwide Box Office : शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पादुकोण(Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांचा पठाण चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आज 27 दिवसांनंतरही त्याची जादू कायम आहे आणि लोक अजूनही थिएटरमध्ये जात आहेत.  या चित्रपटाच्या जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे तर, या चित्रपटाने 1,000 कोटींचा टप्पा पार केला आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे! चला या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरचे लेटेस्ट आकडे समोर आले आहेत.  

इतर चित्रपट रिलीज होऊनही शाहरुख खान स्टारर 'पठान'चं वादळ बॉक्स ऑफिसवर थांबण्याचं नाव घेत नाही आहे. या चित्रपटाने जिथे भारतात 500 कोटींचा आकडा पार केला आहे, वर्ल्ड वाइल्ड  या चित्रपटाने  हजार कोटींचा आकडा पार केला आहे.

बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या ट्विटनुसार, 27 व्या दिवशी पठाण चित्रपटाने 1000 कोटी रुपये कमवले आहेत. या आठवड्यात कार्तिक आर्यनचा 'शहजादा' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याच वेळी मार्वलचा अँट-मॅन अँड द वास्प: क्वांटुमॅनिया देखील प्रदर्शित झाला. असे असूनही 'पठाण'च्या कलेक्शनवर कोणताही परिणाम दिसून आला नाही.


विशेष म्हणजे शाहरुखच्या चित्रपटाने चीनी बॉक्स ऑफिस कलेक्शनशिवाय 1000 कोटींचा आकडा केला आहे. 1000 कोटींचा आकडा पार करणारा भारतातील 5 वा चित्रपट ठरला आहे.

Web Title: Pathaan worldwide box office collection 1000 cr shahrukh khan movie crossed with new record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.