Parineeti-Raghav Wedding: लगीन घटीका समीप आली! परिणीती-राघवच्या घराला केली आलिशान रोषणाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 11:37 AM2023-09-19T11:37:51+5:302023-09-19T11:38:23+5:30

Parineeti-Raghav Wedding: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. या जोडप्याचे काही प्री-वेडिंग फंक्शन्सही दिल्लीत होणार आहेत. सध्या वधू-वरांची घरे पूर्णपणे सजली आहेत.

Parineeti-Raghav Wedding: The wedding is near! Parineeti-Raghava's house was decorated with luxurious lighting | Parineeti-Raghav Wedding: लगीन घटीका समीप आली! परिणीती-राघवच्या घराला केली आलिशान रोषणाई

Parineeti-Raghav Wedding: लगीन घटीका समीप आली! परिणीती-राघवच्या घराला केली आलिशान रोषणाई

googlenewsNext

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा २४ सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. अभिनेत्री आणि आप नेत्याचे लग्न सर्व फंक्शन्ससह पूर्णपणे मोठे वेडिंग असेल. उदयपूरमध्ये या जोडप्याच्या भव्य लग्नापूर्वी दिल्लीतही काही फंक्शन्स होणार आहेत. अशा परिस्थितीत दिल्लीत परिणीती आणि राघवचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. यासोबतच परिणीतीच्या घराची एक झलक समोर आली आहे. ज्यात आलिशान रोषणाई पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात परिणीतीचे घर पूर्णपणे लाइट्सनी सजलेले दिसत आहे. परिणीती आणि राघव यांचा रोका सोहळा १३ मे रोजी दिल्लीत पार पडला होता, ज्यामध्ये त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

राघव यांच्या बंगल्याला शानदार रोषणाई
दिल्लीतही राघव यांचे घर लग्नासाठी पूर्णपणे सजले आहे. मात्र, या दोघांचे लग्न उदयपूरमध्ये होणार आहे. २३ आणि २४ सप्टेंबर रोजी राघव आणि परिणीती यांच्या लग्नाचे सर्व फंक्शन हॉटेल लीला पॅलेसमध्ये आहेत. मात्र, मेहंदी सोहळा दिल्लीत होणार आहे. ज्याची तयारी जोरात सुरू आहे.

कधी आणि कोणते फंक्शन होणार?
दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव यांचा चुडा सोहळा २३ सप्टेंबरला सकाळी १० वाजता सुरू होईल आणि त्यानंतर दुपारी वेलकम लंच होईल. 'लेट्स पार्टी लाइक ९०' या थीमवर संध्याकाळी हे कुटुंब एका भव्य पार्टीत सहभागी होईल. हे कार्यक्रम ताज लेक पॅलेसमध्ये होणार आहेत. २४ सप्टेंबर रोजी, परिणीती आणि राघव द लीला पॅलेसमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत, जिथे लग्नाच्या विधीनंतर रिसेप्शन देखील आयोजित केले जाईल. परिणीतीने तिच्या रोका समारंभासाठी मनीष मल्होत्राचा पोशाख निवडला आहे.
 

Web Title: Parineeti-Raghav Wedding: The wedding is near! Parineeti-Raghava's house was decorated with luxurious lighting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.