सजन घर ले चली! सासरी जाताना परिणीती चोप्राला अश्रू झाले अनावर, कुटुंबीयाही झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 11:24 AM2023-09-25T11:24:04+5:302023-09-25T16:28:58+5:30

परिणीतीच्या पाठवणीच्या वेळी संपूर्ण चोप्रा कुटुंबीय इमोशनल झाले होते.

Parineeti raghav wedding parineeti chopra cried bitterly during her bidaai chopra family too got emotional | सजन घर ले चली! सासरी जाताना परिणीती चोप्राला अश्रू झाले अनावर, कुटुंबीयाही झाले भावूक

सजन घर ले चली! सासरी जाताना परिणीती चोप्राला अश्रू झाले अनावर, कुटुंबीयाही झाले भावूक

googlenewsNext

परिणीती चोप्राचं राघव चड्ढांसोबत मोठ्या धुमधडक्यात लग्न झालं. आता या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ हळूहळू समोर येते आहेत. परिणीतीने ही लग्नातील सुंदर फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. परिणीती आणि राघवच्या फोटोंवर सेलिब्रेटींसह चाहत्यांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे. लग्नात एखाद्या राजकुमारी एवढीच सुंदर परिणीती दिसत होती. दरम्यान पाठवणीच्या क्षणी अभिनेत्री कमालाची भावूक झाल्याचं समजतंय. 

 मुलगी ही आई वडीलांच्या काळजाचा तुकडा असते. हा काळजाचा तुकडा विवाहानंतर तिच्या पतीची जबाबदारी होतो. वधूला निरोप देतानाचे भावनिक वातावरण आपण कुठल्यातरी लग्नात अनुभवलेच असेल. याला सेलिब्रेटी तरी कसे अपवाद असतील. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा पाठवणीच्या वेळी भावूक झाली. या दरम्यान अभिनेत्री खूप रडली. संपूर्ण चोप्रा कुटुंबीयांसाठी हा क्षण खूप इमोशनल होता. लेकीची पाठवणी करताना आई-वडिलांही अश्रू अनावर झाले. 
 
दरम्यान परिणीती आणि राघव यांनी लग्नासाठी अत्यंत साधा लूक केला होता. परिणीतीने लग्नासाठी खास क्रिम रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. खड्यांची मॅचिंग ज्वेलरीमुळे नववधू परिणीतीचं सौंदर्य खुललं होतं. तर राघव चड्ढा यांनी पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. डोक्यावर फेटा बांधल्यामुळे राघव चड्ढा अगदी राजबिंडासारखे दिसत होते. 

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. या लग्नाला जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळीच हजर होती. मनीष मल्होत्रा, सानिया मिर्झा,  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तर पंजाबचे मुख्यमंत्री भगंवत मान आणि आदित्य ठाकरे उपस्थिती होते. लग्नानंतर परिणीती एक नाही तर आणखी दोन रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. एक रिसेप्शन दिल्ली तर दुसरं मुंबईत होणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Parineeti raghav wedding parineeti chopra cried bitterly during her bidaai chopra family too got emotional

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.