मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत आउट आॅफ कंट्रोल झाले पापा अनिल कपूर, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2018 15:53 IST2018-05-09T10:23:04+5:302018-05-09T15:53:33+5:30
मुलगी सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत पापा अनिल कपूर आउट आॅफ कंट्रोल झाल्याचे दिसून आले. त्याने तुफान डान्स करीत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.

मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत आउट आॅफ कंट्रोल झाले पापा अनिल कपूर, पाहा व्हिडीओ!
अ िनेत्री सोनम कपूर ८ मे रोजी विवाहाच्या बंधनात अडकली. अतिशय थाटामाटात पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात सर्वच आपल्या रंगात रंगताना दिसून आले. या लग्नाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पापा अनिल कपूरमधील एनर्जी. ६१ वर्षीय अनिल कपूरने दाखवून दिले की, या वयातही त्याचा मुकाबला करणे अशक्य आहे. कारण मुलगी सोनम कपूरच्या मेहंदी सेरेमनीपासून ते रिसेप्शनपर्यंत त्याच्यातील एनर्जी बघण्यासारखी होती. त्याने या सर्व सोहळ्यांमध्ये तुफान डान्स केला. मुलीच्या लग्नाचा त्याच्या चेहºयावरील आनंद बघण्यासारखा होता. रिसेप्शन सोहळ्यात तर तो आउट आॅफ कंट्रोल झाल्याचे दिसून आले.
सोनमच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यातील एक व्हिडीओ समोर येत असून, त्यामध्ये अनिल कपूर आपल्या ‘राम-लखन’ या सुपरहिट चित्रपटातील एका गाण्यावर तुफान डान्स करताना बघावयास मिळत आहे. अनिलच्या चेहºयावरील एनर्जी आणि चमक बघण्यासारखी आहे. हा व्हिडीओ खरोखरच जबरदस्त असून, त्यामध्ये अनिल त्याच्या तरुणपणातील असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर हा व्हिडीओ बघताना याचीदेखील जाणीव होते की, या वयातही त्याच्याशी स्पर्धा करणे अवघड आहे. खरं तर मुलीच्या लग्नात केवळ मुलाकडची मंडळी एन्जॉय करीत असते. मात्र अनिलचा डान्स बघून हा समज त्याने काहीसा दूर केल्याचेच दिसून येते.
दरम्यान, या अगोदरही मेहंदी सेरेमनीमध्ये त्याचा असाच काहीसा अंदाज बघावयास मिळाला होता. इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज सेलिब्रिटींबरोबर त्याने तुफान डान्स केला होता. शिल्पा शेट्टी, करण जोहरसोबत त्याने लावलेले ठुमके अनेकांना आश्चर्यचकित करणारे होते. त्याचा हा व्हिडीओदेखील त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता.