painting is fun : ​प्रियांका चोप्राने हाती घेतला कुंचला? कुणाकडून घेतली प्रेरणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 12:16 IST2017-04-03T06:46:24+5:302017-04-03T12:16:24+5:30

सध्या प्रियांका चोप्रा पेन्टिंगच्या मूडमध्ये आहे. तिचा नवा छंद. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

painting is fun: Priyanka Chopra took control? Motivation taken from someone? | painting is fun : ​प्रियांका चोप्राने हाती घेतला कुंचला? कुणाकडून घेतली प्रेरणा?

painting is fun : ​प्रियांका चोप्राने हाती घेतला कुंचला? कुणाकडून घेतली प्रेरणा?

रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये बिझी आहे. पण बॉलिवूड तिची पाठ सोडायला तयार नाही. होय, असे नसते तर सलमान खानची प्रेरणा घेत प्रियांकाने हाती कुंचला घेतला नसता. धक्का बसला ना? पण हे खरे आहे. सध्या प्रियांका पेन्टिंगच्या मूडमध्ये आहे. तिचा नवा छंद. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात प्रियांकाच्या हातात आहे, पेन्टब्रश. समोर आहे, व्हाईट कॅनव्हॉस. अगदी प्रोफेशनल आर्टिस्टला लाजवेल असा प्रियांकाचा थाट आहे. टी-शर्ट आणि डेनिम, त्यावर अप्रॅन. हातात ब्रश, समोर स्टँटवरचा कॅनव्हास. प्रियांका पेन्टिंगमध्ये अगदी गढून गेलेली या फोटोत दिसते आहे.



  सलमानपासून प्रियांकाने ही प्रेरणा घेतली असावी, असेच अनेकांना वाटेल. कदाचित असे असेलही पण पेन्टिंगकडे प्रियांका वळली ते तिच्या को-स्टार्समुळे. होय, ‘कॉन्टिको’तील प्रियांकाची को-स्टार यास्मिन अल मसरी हिच्यामुळे. संडेला पीसीचा लर्निंग डे होता. मग यादिवशी प्रियांकाने यास्मिनकडून पेन्टिंग शिकायचे ठरवले. यास्मिननेही तिला अगदी आनंदाने शिकवले. याच क्षणाचा फोटो प्रियांकाने इन्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘Sunday shenanigans.. thank u @jazmasri @mdesante for the lesson!! #paintingisfun’, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

ALSO READ : watch : ​‘बेवॉच’चे प्रमोशन अन् प्रियांका चोप्राची धम्माल मस्ती!

 इन्स्टाग्रामवरील प्रियांकाचा हा फोटो लक्ष वेधून घेतो आहे. सोबत या फोटोखालचे काही कमेंट्सही लक्षवेधी आहेत. एका चाहत्याने प्रियांकाचा हा फोटो पाहून मस्तपैकी गुगली केली आहे. ‘सब कुछ करोगी क्या. कुछ तो छोड दो दुसरों के लिए’ असे या चाहत्याने लिहिले आहे. अर्थात हा झाला गमतीचा भाग. पण प्रियांकासाठी काहीही अशक्य नाही, हे मात्र मान्य केलेच पाहिजे. अ‍ॅक्ंिटग, सिंगींग, प्रॉडक्शन आणि आता पेन्टिंग. वेल डन प्रियांका!
 

Web Title: painting is fun: Priyanka Chopra took control? Motivation taken from someone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.