PADMAVATI ASSAULT: जयपूरचे राजघराणे करणार संजय लीला भंसाळीवर शिस्तभंगाची करवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 12:21 PM2017-02-10T12:21:40+5:302017-02-10T17:51:40+5:30

संजय लीला भंसाळीच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेतातना दिसत नाही. ‘करणी सेने’च्या हल्ल्यानंतर आता जयपूरचे पूर्व राजघराणे ‘पद्मावती’ ...

PADMAVATI ASSAULT: Disciplinary action against Sanjay Leela Bhaskali for dynasty of Jaipur | PADMAVATI ASSAULT: जयपूरचे राजघराणे करणार संजय लीला भंसाळीवर शिस्तभंगाची करवाई

PADMAVATI ASSAULT: जयपूरचे राजघराणे करणार संजय लीला भंसाळीवर शिस्तभंगाची करवाई

googlenewsNext
जय लीला भंसाळीच्या अडचणी काही कमी होण्याचे नाव घेतातना दिसत नाही. ‘करणी सेने’च्या हल्ल्यानंतर आता जयपूरचे पूर्व राजघराणे ‘पद्मावती’ चित्रपटासाठी शूटींगची परवानगी मिळवणाऱ्या विभागावर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे कळतेय. ‘जयगड किल्ल्या’वर शूटींगची परवानगी मिळवताना चित्रपटाबाबत संपूर्ण माहिती दिली नसल्याने राजघराण्याने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

२७ जानेवारी रोजी या किल्ल्यावर शूटींग सुरू असताना ‘करणी सेना’ नावाच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सेटवर घुसून धुमाकूळ घातला होता. चित्रिकरणाच्या उपकरणांची नासधूस करण्याबरोबरच दिग्दर्शक भंसाळींनाही मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ बाहेर आला होता. त्यावर संपूर्ण बॉलीवूडमधून संताप व्यक्त करण्यात आला होता.

चित्रपटात इतिहासाचे चुकीचे दर्शन घडविले जात असल्याचा आरोप करीत करणी सेनेने हल्ल्याचे समर्थन केले होते. त्याला एका प्रकारे पाठिंबा देत राजघराण्याने जाहीर केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले गेले की, ‘शूटींगची परवानगी मिळवणाऱ्या विभागाने आम्हाला चित्रपटाबाबत अपूर्ण माहिती देऊन चित्रिकरणाची परवानगी मिळवली. हे आमच्या लक्षात आल्यावर संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.’

ALSO READ: संजय लीला भंसाळींनी घेतली जयपूरमध्ये कधीच शूटींग न करण्याची शपथ

पूर्व राजमाता पद्मिनी देवी यांनीसुद्धा स्टेटमेंटमध्ये राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची मोडतोड होऊ देणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, ‘येथून पुढे चित्रपटाच्या संपूर्ण पटकथेचा अभ्यास करूनच घराण्याच्या अधिकारातील ऐतिहासिक जागांवर शूटींगची परवानगी देण्यात येईल. इतिहासाचे अपमानास्पद किंवा चुकीचे दर्शन दाखवले जाणार असेल तरी ही बाब कधीच खपवून घेतली जाणार नाही. राजस्थानचा समृद्ध व गाौरवशाली इतिहास जिवंत ठेवण्यासाठी कार्यरत श्री राजपूत करणी सेना व इतर राष्ट्रवादी संघटनांना आमचे पूर्ण समर्थन आहे.’

मेवाड साम्राज्याची राणी पद्मावती यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात पद्मावती (दीपिका पदुकोन) आणि अल्लाउद्दीन खिलजी (रणवीर सिंग) यांचा क ाल्पनिक रोमॅण्टिक सीन चित्रित केला जाणार असल्याचा आक्षेप घेत राजपूत संघटनांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. त्यावर निर्मात्यांनी खुलासा केला की, अशा प्रकारचा कुठलाही सीन सिनेमात नाही.

ALSO READ: ​ संजय लीला भंसाळीच्या पाठीशी उभे राहिले बॉलीवूड

Web Title: PADMAVATI ASSAULT: Disciplinary action against Sanjay Leela Bhaskali for dynasty of Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.