PADMAVATI ASSAULT : कोल्हापुरातील ‘पद्मावती’च्या सेटवर तोडफोड; आग लावण्याचे प्रयत्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 11:30 IST2017-03-15T06:00:25+5:302017-03-15T11:30:25+5:30

काही दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘पद्मावती’च्या सेटची तोडफोड करत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाण केली होती. या प्रकारानंतर भन्साळींनी कोल्हापुरात ‘पद्मावती’चा सेट उभारला होता. पण काल(मंगळवारी) रात्री काही अज्ञात व्यक्तिंनी या सेटची तोडफोड करत त्याल आग लावण्याचा प्रयत्न केला.

PADMAVATI ASSAULT: Breakthrough at Padmavati's set of Kolhapur; Attempts to set a fire! | PADMAVATI ASSAULT : कोल्हापुरातील ‘पद्मावती’च्या सेटवर तोडफोड; आग लावण्याचे प्रयत्न!

PADMAVATI ASSAULT : कोल्हापुरातील ‘पद्मावती’च्या सेटवर तोडफोड; आग लावण्याचे प्रयत्न!

ही दिवसांपूर्वीच राजस्थानमध्ये करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘पद्मावती’च्या सेटची तोडफोड करत दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मारहाण केली होती. या प्रकारानंतर भन्साळींनी कोल्हापुरात ‘पद्मावती’चा सेट उभारला होता. पण काल(मंगळवारी) रात्री काही अज्ञात व्यक्तिंनी या सेटची तोडफोड करत त्याल आग लावण्याचा प्रयत्न केला. 



कोल्हापुरातील मसई पठारावर सध्या या चित्रपटाचे शुटिंग सुरू आहे. यासाठी सेट उभारण्यात आला आहे. याचठिकाणी ही घटना घडली. या घटनेमागे कुणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तूर्तास पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.





‘पद्मावती’त राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा काहींचा आक्षप आहे. याचमुळे सध्या भन्साळींच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला जोरदार विरोध केला जात आहे. गत जानेवारीच्या अखेरिस राजस्थानच्या जयपूर नजिक जयगढ येथे  ‘पद्मावती’चे शूटींग सुरु असताना करणी सेनेने याठिकाणी धिंगाणा घातला होता. 



चित्रपटात राणी पद्मावती आणि अल्लाउद्दिन खिलजी यांचे प्रणय प्रसंग चित्रित केले जाणार असल्याच्या वृत्ताने हा विरोध सुरू झाला होता. या भागातील लोकप्रिय धारणेनुसार, पद्मावतीने खिलजीच्या दबावाला बळी न पडता स्वत:च्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध नव्हतेच. त्यामुळे ‘पद्मावती’त राणी पद्मावती व अल्लाउद्दिन खिल्जी यांच्यात रोमॅण्टिक सीन चित्रित केला जाणार,अशी चर्चा ऐकून करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या सेटची तोडफोड करत भन्साळी यांना मारहाण केली होती. या घटनेनंतर राजस्थानात कधीच शूटींग न करण्याचा निर्णय भन्साळींनी घेतला होता आणि कोल्हापुरात ‘पद्मावती’चा सेट हलवला होता. कोल्हापुरात चित्रिकरण सुरु होणार तोच  या  सेटवरही राजस्थानच्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. अद्याप या संपूर्ण घटनेवर भन्साळींची प्रतिक्रिया आलेली नाही. कोल्हापुरातील या घटनेनंतर भन्साळी कुठला निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ALSO READ : PADMAVATI ASSAULT: संजय लीला भंसाळीच्या पाठीशी उभे राहिले बॉलीवूड
​‘पद्मावती’मध्ये चुकीचे संदर्भ : सेटवर करणी सेनेने घातला धिंगाणा

 सुरूवातीपासून वादाच्या भोव-यात अडकलेल्या या चित्रपटात दीपिका पदुकोण राणी पद्मावतींच्या मुख्य भूमिकेत आहे तर शाहीद कपूर तिचा पती रावल रतन सिंग तर रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिलजी साकारत आहे.

Web Title: PADMAVATI ASSAULT: Breakthrough at Padmavati's set of Kolhapur; Attempts to set a fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.