Padmavat Box Office Collection : ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये ‘पद्मावत’ला स्थान; वाचा आतापर्यंतचे कलेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 15:59 IST2018-02-20T10:26:21+5:302018-02-20T15:59:22+5:30
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर स्टारर ‘पद्मावत’ने जबरदस्त कमाई करीत बॉक्स आॅफिसवर इतिहास रचला आहे. ...
.jpg)
Padmavat Box Office Collection : ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये ‘पद्मावत’ला स्थान; वाचा आतापर्यंतचे कलेक्शन!
ब लिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर स्टारर ‘पद्मावत’ने जबरदस्त कमाई करीत बॉक्स आॅफिसवर इतिहास रचला आहे. लवकरच हा चित्रपट वर्ल्ड वाइड कलेक्शनमध्ये ५०० कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. चित्रपटाने भारतात आतापर्यंत २८० कोटी रूपयांचे कलेक्शन केले आहे, तर इतर देशांमध्येही चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. विशेष म्हणजे गेल्या चार आठवड्यांपासून चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर दबदबा निर्माण केल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत वर्ल्ड वाइड ४९९ कोटी रूपयांची कमाई केली असून, लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवेल अशी शक्यता आहे.
वास्तविक ‘पद्मावत’नंतर दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र अशातही प्रेक्षक ‘पद्मावत’ बघण्यास प्राधान्य देत असल्याने चित्रपट आगामी काळात आणखी कमाई करण्याची शक्यता आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने चित्रपटासंबंधी काही आकडे त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने १६६ कोटी ५० लाख रूपयांची कमाई केली आहे. दुसºया आठवड्यात ६९ कोटी ५० लाख रूपयांचा, तर तिसºया आठवड्यात ३१ कोटी ७५ लाखांची कमाई केली आहे. चौथ्या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसून आले. ८ कोटी ७५ लाखांची कमाई करीत चित्रपटाने एकूण २८० कोटींची कमाई केली.
दरम्यान, या चित्रपटाची शूटिंग सुरू होती तेव्हापासूनच चित्रपट वादाच्या भोवºयात आहे. करणी सेनेसह इतर काही राजपूत संघटनांनी चित्रपटाला विरोध दर्शविल्यामुळे चित्रपट प्रदर्शित होईल की नाही अशी शक्यता वर्तविली जात आहे. चित्रपटातील बºयाचशा दृश्यांना कात्री लावल्यानंतर हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, चित्रपटात रणवीर सिंग अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे. शाहिद कपूरने राजा रावल रतन सिंगची भूमिका साकारली आहे, तर दीपिका राणी पद्मावतीच्या मुख्य भूमिकेत आहे.