Oscars 2022 Nominations: ‘ऑस्कर’ नामांकन मिळवणाऱ्या Writing With Fire या भारतीय माहितीपटात नेमकं काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 10:37 AM2022-02-09T10:37:48+5:302022-02-09T10:41:01+5:30

Oscars 2022 Nominations: काल मंगळवारी जाहिर झालेल्या 94 व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनामध्ये ‘रायटिंग विथ फायर’ या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळालं. तूर्तास ‘रायटिंग विथ फायर’ बद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

Oscars 2022 Nominations: indian documentary writing with fire is nominated for best documentary feature at 94th oscar | Oscars 2022 Nominations: ‘ऑस्कर’ नामांकन मिळवणाऱ्या Writing With Fire या भारतीय माहितीपटात नेमकं काय आहे?

Oscars 2022 Nominations: ‘ऑस्कर’ नामांकन मिळवणाऱ्या Writing With Fire या भारतीय माहितीपटात नेमकं काय आहे?

googlenewsNext

 Oscars 2022 Nominations:  काल मंगळवारी जाहिर झालेल्या 94 व्या ऑस्कर पुरस्कार नामांकनामध्ये ‘रायटिंग विथ फायर’ (Writing With Fire) या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळालं. ऑस्करच्या नामांकनाच्या शर्यतीत  जय भीम आणि मरक्कर हे दोन भारतीय सिनेमे होते. पण हे दोन्ही चित्रपट बाद झालेत. ‘रायटिंग विथ फायर’ने मात्र आपलं स्थान कायम ठेवलं. आता हा माहितीपट ऑस्करच्या शर्यतीत किती मोठा पल्ला गाठतो, याकडे सर्व भारतीयांचं लक्ष असणार आहे.
तूर्तास तरी ‘रायटिंग विथ फायर’ बद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. मुळात ही डॉक्युमेंट्री कशाबद्दल आहे, यात कोण कोण कलाकार आहेत, हे आज आम्ही सांगणार आहोत.

ही आहे सटारकास्ट
‘रायटिंग विथ फायर’ ही डॉक्युमेंट्री सुस्मित घोष आणि रिंटू थोमस यांनी दिग्दर्शित केली आहे.   घोष अ‍ॅण्ड थॉमस ब्लॅक तिकिट फिल्म्स बॅनर या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत तयार झालेल्या या माहितीपटात सुनिता प्रजापती, मीरा देवी, श्यामकली देवी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

काय आहे कथा
‘रायटिंग विथ फायर’ ही डॉक्युमेंट्री मुळात दलित महिलांची कहाणी आहे. होय,  दलित महिला आणि या महिलांद्वारे चालवल्या जाणाºया एका वृत्तपत्राची कहाणी या ९० मिनिटाच्या माहीतापटात दाखवली गेली आहे. ‘खबर लहरिया’ नावाचं वृत्तपत्र हे दलित महिलांद्वारे संचालित होणारं भारतातील एकमेव वृत्तपत्र होतं.
 उत्तरप्रदेशमधील चित्रकूट जिल्ह्यातील करवी नावाचं एक छोटंस गाव. या गावातील दलित महिलांनी एकत्र येऊन 2000 साली एक वृत्तपत्र सुरु केलं. ‘खबर लहरिया’ असं नाव असलेल्या या वृत्तपत्रात दलित महिला पत्रकार बदलता समाज,भ्रष्टाचार, गरिब व महिलांच्या कथा लिहायच्या. बुंदेलखंडी भाषेतील हे वृत्तपत्र 2002 साली चित्रकूटसह बुंदेलखंडच्या अनेक जिल्ह्यात प्रकाशित व्हायचं.  याच वृत्तपत्राच्या जन्माची कहाणी ‘रायटिंग विथ फायर’मध्ये दाखवली गेली आहे.  या आठ पानाच्या साप्ताहिकासाठी दलित महिला फिरुन बातम्या जमा करतात. समाज व्यवस्थेशी लढत, बंधनांना झुगारत लिहिण्याचं धाडस करतात,  याचं चित्रण या माहितीपटात आहे. 

2015 मध्ये वृत्तपत्र बंद पडलं, पण...
2015 साली ‘खबर लहरिया’ बंद पडलं. पण पूर्णपणे नाही. तेव्हापासून आजपर्यंत ते मोबाईल पोर्टलवर सुरू आहे. तंत्रज्ञानाचा ज्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, अशा ग्रामीण भागातील दलित महिला या पोर्टलसाठी मोबाईल शिकल्या. व्हिडिओचं प्रशिक्षण घेतलं आणि आज या महिलांनी यशस्वीपणे डिजिटल क्षेत्रातही आपला ठसा कसा उमटवला. याच महिलांची आगळ्यावेगळ्या जिद्दीची  कथा या माहितीपटात आहे.प्रिंट ते डिजिटल असा दलित महिलांचा प्रवास यात चितारण्यात आला आहे.

Web Title: Oscars 2022 Nominations: indian documentary writing with fire is nominated for best documentary feature at 94th oscar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.