​‘या’ बातमीने भडकला ‘सोनू के टिटू की स्वीटी’चा हा अभिनेता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 09:51 IST2018-05-28T04:21:13+5:302018-05-28T09:51:13+5:30

‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटाच्या अनपेक्षित यशानंतर प्रकाशझोतात आलेला अभिनेता कार्तिक आर्यन सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत ...

'Or' news 'Bhadkala' sonu ki titu suwatei actor! | ​‘या’ बातमीने भडकला ‘सोनू के टिटू की स्वीटी’चा हा अभिनेता!

​‘या’ बातमीने भडकला ‘सोनू के टिटू की स्वीटी’चा हा अभिनेता!

ोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटाच्या अनपेक्षित यशानंतर प्रकाशझोतात आलेला अभिनेता कार्तिक आर्यन सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. हे कारण म्हणजे कार्तिकचे त्याच्या मेंटरसोबतचा मतभेद. आता कार्तिकचा मेंटर कोण, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. होय, दिग्दर्शक लव रंजन. दिग्दर्शक लव रंजन यांच्यासोबत कार्तिकचे बिनसल्याचे कानावर येतेय. पैशाच्या मुद्यावरून या दोघांत बिनसल्याचे कळतेय.   या बातमीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. साहजिकचं खरे खोटे काय, हे जाणून घेण्यात सगळेच उत्सूक आहेत. मीडियाने नेमके हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रश्न विचारण्याची देर की, कार्तिक चांगलाच भडकला. माझ्यात व लव रंजन सरांमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. अशा बातम्या कुठून येतात, तेच मला कळत नाही. माझ्यात व सरांमध्ये पैशांवरून कुठलाही वाद झालेला नाही. आमचे नाते आधी होते तसेच आहे. आम्ही  दोघांनीही आमच्या करिअरची एकत्र सुरूवात केलीय. त्यामुळे आमच्यात पैशांवरून ना कुठली चर्चा झाली ना होईल. आमचे दोघांचे नाते आधीसारखेच आहे. कृपा करून वाट्टेल त्या बातम्या पेरू नका, असे कार्तिक म्हणाला.



कार्तिक व रंजन यांनी चार चित्रपट एकत्र केले आहेत. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटापासून आपला चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू केल्यानंतर दोघांनी ‘आकाशवाणी’,‘प्यार का पंचनामा2’ आणि ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटांत एकत्र काम केले.

ALSO READ : काय म्हणता, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ फेम कार्तिक आर्यनला भन्साळींची आॅफर? 

चार चित्रपटांत एकत्र काम केल्यानंतर दोघांमध्ये मतभेदाच्या बातम्या येत असतील तर साहजिकच सर्वांसाठीच हे धक्कादायक आहे. अर्थात कार्तिक म्हणतो, त्याप्रमाणे या बातम्या खोट्या असतील तर तूर्तास तरी त्यावर विश्वास ठेवायलाच हवा. तूर्तास यासाठी कारण, काळासोबत सत्य बाहेर येणार आहेच.

Web Title: 'Or' news 'Bhadkala' sonu ki titu suwatei actor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.