डिलीव्हरीसाठी करीना घेणार केवळ तीन महिन्याची रजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 16:18 IST2016-09-20T10:48:01+5:302016-09-20T16:18:01+5:30
करीना कपूर गर्भवती असल्याचे समारे आल्यापासून तिच्या चित्रपटाचे काय होईल,अशी चर्चा झाली होती. परंतु, यानंतरही करीनाने काम सुरुच ठेवून ...

डिलीव्हरीसाठी करीना घेणार केवळ तीन महिन्याची रजा
करीना कपूर गर्भवती असल्याचे समारे आल्यापासून तिच्या चित्रपटाचे काय होईल,अशी चर्चा झाली होती. परंतु, यानंतरही करीनाने काम सुरुच ठेवून असे म्हणणाºयांना उत्तर दिले आहे. डिसेंबरमध्ये करिनाची डिलीव्हरी होणार आहे. तरीही अजूनही तिने आपले काम सुरुच ठेवले आहे. डिलीव्हरीनंतर करीना ही तीन महिन्यानंतरच सेटरवर परतणार आहे. डिलीव्हरीसाठी थोडाच कालावधी शिल्लक आहे, तरीही तिला लोक आपल्याला काय म्हणतील याची कोणतीच चिंता नसल्याचे दिसत आहे. ती सध्याही आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. डिलीव्हरीनंतर जास्त आराम करणार नसल्याचे तिने एका इव्हेंटमध्ये सांगितले. ती लवकरच परतण्याची प्लॅनिंग करीत आहे. ‘वीरे दी वेडिंग’ ची शुटींग पुढील महिन्यात तर उर्वरित शुटींग पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणार असल्याचे करिना म्हणाली.
वीर दी वेडिंग ची शुटींग सुरु होण्याच्या अगोदर करिनाने निर्माता रिया कपूरला गर्भवती असल्याचे सांगितले नव्हते, असेही वृत्त आले होते. परंतु, ही कल्पना मी अगोदरच रियाला दिलेली होती, असेही करिना म्हणाली.