OMG !! ​सनी लिओनीची कंडोम जाहिरात पुन्हा वांद्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 10:29 IST2017-04-18T04:59:05+5:302017-04-18T10:29:05+5:30

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनी  तिच्या कंडोम जाहिरातीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली ...

OMG !! Sunny Leoni's condom advertising again! | OMG !! ​सनी लिओनीची कंडोम जाहिरात पुन्हा वांद्यात!

OMG !! ​सनी लिओनीची कंडोम जाहिरात पुन्हा वांद्यात!

र्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिओनी  तिच्या कंडोम जाहिरातीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)च्या महिला शाखेने सनीच्या कंडोम जाहिरातीला विरोध केला आहे. या जाहिरातीचे प्रसारण रोखण्याची मागणी या शाखेने केली आहे.
सनी लिओनी पॉर्न चित्रपटांची अभिनेत्री राहिलेली आहे. तिची कंडोमची जाहिरात टीव्हीवर पाहणे लज्जास्पद आहे. सगळे कुटुंब एकत्र टीव्हीसमोर बसले असताना अशी जाहिरात पाहून महिला प्रेक्षकांना लाजीरवाणे वाटते. ही जाहिरात चुकीचा संदेश देते. भारत एक विकसनशील देश आहे. याचा अर्थ अशा अश्लिल जाहिराती दाखवल्या जाव्यात, असे नाही, असे या पार्टीच्या महिला शाखेच्या सचिव शीला गांगुर्दे यांनी म्हटले आहे. आम्हाला अनेक महिलांकडून या जाहिरातीबाबत तक्रारी मिळाल्या असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. सनीच्या या जाहिरातीचे प्रसारण रोखण्यासाठी संबंधित महिला शाखेने आठवडाभराचा कालावधी दिला आहे. आठवडाभरात या जाहिरातीचे प्रसारण थांबवले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शाखेने दिला आहे. केवळ कंडोमच नाही तर गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातींचे प्रसारणही बंद व्हायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ALSO READ : ‘बेपर्वा’ ​सनी लिओनीची पुन्हा एक ‘हॉट’ जाहिरात!

काही महिन्यांपूर्वी सनीच्या कंडोमच्या जाहिरातीवर बंदी लादण्याची मागणी करत, गोव्यातील एक संघटना रस्त्यावर उतरली होती. अर्थात त्यानंतर काहीच दिवसांनी  सनीची आणखी एक नवी, हॉट कंडोम जाहिरात लॉन्च करण्यात आली होती. सोशल मीडियावर या जाहिरातीची तितकीच हॉट चर्चाही झाली होती. या जाहिरातीत सनी यात अतिशय बोल्ड रूपात  दिसली होती.

Web Title: OMG !! Sunny Leoni's condom advertising again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.