OMG : ​सलमान खानचा ‘हा’ चित्रपट पाहून Shocked झाली होती जीनत अमान, जाणून घ्या कारण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 18:36 IST2017-07-13T12:42:56+5:302017-07-13T18:36:49+5:30

सलमान खानचा दुसरा चित्रपट ‘मैने प्यार किया’ (१९८९) रिलीज होण्याअगोदर त्याने मित्रांना दाखविण्याचा निर्णय घेतला होता. याच कारणाने त्याने ...

OMG: Salman Khan's 'Ha' movie was shocked to see Jainat Aman, know the reason! | OMG : ​सलमान खानचा ‘हा’ चित्रपट पाहून Shocked झाली होती जीनत अमान, जाणून घ्या कारण !

OMG : ​सलमान खानचा ‘हा’ चित्रपट पाहून Shocked झाली होती जीनत अमान, जाणून घ्या कारण !

मान खानचा दुसरा चित्रपट ‘मैने प्यार किया’ (१९८९) रिलीज होण्याअगोदर त्याने मित्रांना दाखविण्याचा निर्णय घेतला होता. याच कारणाने त्याने बांद्रा स्थित एका हॉटेलमध्ये या चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवली होती. सलमाने यासाठी जीनत अमानलाही बोलविले होते, मात्र सलमानचा हा चित्रपट पाहून जीनतची प्रतिक्रिया खूपच शॉकिंग होती. 

जब सलमान की यह फिल्म देख शॉक्ड रह गई थीं जीनत, ये थी वजह

या चित्रपटात एका सीनमध्ये सलमान खान अभिनेत्री भाग्यश्रीच्या पायाच्या घोट्याला मलम लावताना दाखविण्यात आले आहे आणि यादरम्यान तीने लाजिरवाणे होऊन डोळे बंद केले होते. या सीनबद्दल जीनत अमानचे म्हणणे होते की, ‘जर अभिनेत्रीच्या गुडघ्याला मलम लावले गेले असते तर यात लाजिरवाणे होणे स्वाभाविक होते, मात्र अभिनेत्रीच्या घोट्याला असे करताना लाजिरवाणे होणे खरच चकित करण्यासारखे आहे.’ 

सलमानच्या मते, ‘घोट्याच्या वरती पाय एक्सपोज करण्यात भाग्यश्रीला अनकम्फर्टेबल वाटत होते. यामुळे मला तिच्या घोट्याला मलम लावणे उचित वाटले. ’ 

* आरशाच्या साह्याने शूट झाले होते सीन 
‘मैने प्यार किया’ची शूटिंग संपल्यानंतर लवकरच भाग्यश्रीचे लग्न होणार होते. अशावेळी ती शॉर्ट ड्रेस आणि आॅनस्क्रिन किसिंग सीनमुळे जास्त अस्वस्थ असायची. याच कारणाने चित्रपटातील कि सिंग सीन आरसा आणि रिफलेक्टर क्लॉथच्या साह्याने शूट करण्यात आले होते.    
बऱ्याचजणांना माहित नसेल की, या चित्रपटाचा फर्स्ट कट पाहून सलमानच्या फॅमिली मेंबर्सना झोप लागली होती. स्वत: सलमानने एका मुलाखतीदरम्यान या गोष्टीचा खुलासा केला होता.  

सलमान नव्हे तर दीपक तिजोरी होता पहिली पसंत 
‘मैने प्यार किया’साठी अगोदर सलमान खान अगोदर दीपक तिजोरीला पहिली पसंती देण्यात आली होती. मात्र सलमान खान आणि मोहनीश बहल यांनी सोबतच आॅडिशन दिले होते. त्यानंतर सलमानला लीड रोलसाठी आणि मोहनीशला निगेटिव्ह रोलसाठी सिलेक्ट करण्यात आले. सलमानने प्रेमचा रोल एवढा परफेक्ट निभविला की, त्याला यासाठी  फिल्मफेयर बेस्ट अवॉर्ड मिळाला होता.

source : bollywood.bhaskar.com 

Web Title: OMG: Salman Khan's 'Ha' movie was shocked to see Jainat Aman, know the reason!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.